RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:02 IST2025-10-03T19:01:27+5:302025-10-03T19:02:25+5:30
Uttar Pradesh RSS : या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
Uttar Pradesh RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित पथसंचलनादरम्यान एका स्वसंसेवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात घडली आहे. पथसंचलनात बॅण्ड वाजवत असताना स्वयंसेवकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला, ज्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत स्वयंसेवकाचे नाव अंकित सिंह असे असून, तो इमलिया परिसरातील रहिवासी होता. तो पथसंचलनात बॅण्ड पथकात मोठा ढोल वाजवत होता. ढोल वाजवताना अचानक अंकित जमिनीवर कोसळतो. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून अंकितला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना अवघ्या १६ सेकंदात घडली.
ड्रम बजा रहे स्वयंसेवक की हुई मौत वीडियो में कैद हुई घटना l इमलिया सुल्तानपुर क्षेत्र में पथ संचलन के दौरान हुई मौत@dm_sitapur@RSSorg@myogiadityanath@UPGovt@mlashashank@gyantiwaribjppic.twitter.com/11gGIJ0Pjw
— दुर्गेश शुक्ल / Durgesh shukla (@durgeshjagran) October 3, 2025
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी पथसंचलन आयोजित केले जात आहे. सीतापूरच्या इमलिया सुलतानपुर परिसरातील पथसंचलनादरम्यान ही घटना घडली. अंकित सिंह अचानक कोसळून मृत्युमुखी पडल्याने स्वयंसेवक, स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...