भरसभेत शेतकऱ्याने भाजप आमदाराला मारली चापट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 18:48 IST2022-01-07T18:48:08+5:302022-01-07T18:48:15+5:30
या घटनेनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

भरसभेत शेतकऱ्याने भाजप आमदाराला मारली चापट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कानपूर:उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये भाजप आमदार पंकज गुप्ता ( BJP MLA Pankaj Gupta) यांना एका शेतकऱ्याने भर सभेत मंचावर चापट मारल्याची घटना घडली आहे. पकंज गुप्ता एका मूर्तीच्या अनावरणासाठी आले होते. त्यावेळी मंचावर एका वृद्ध शेतकऱ्याने गुप्ता यांना सर्वांसमोर चापट मारली.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार पंकज गुप्ता तीन दिवसांपूर्वी एका मूर्तीच्या अनावरणासाठी आपल्या मतदारसंघात आले होते. मूर्तीच्या अनावरणानंतर लोकांना संबोधित केले. यावेळी मंचावर एक वृद्ध शेतकरी काठी घेऊन आला. तो व्यक्ती मंचावर येईपर्यंत कोणालाही तो असे काही करेल, याची जाणीव नव्हती.
मंचावर आल्यानंतर तो पंकज गुप्ता यांच्या जवळ आला आणि त्यांना चापट मारली. चापट मारणाऱ्या शेतकऱ्याचे वय 60 वर्षे असून, त्याने भारतीय किसान युनियनची (BKU) टोपी घातलेली होती. आमदाराला चापट मारल्यानंतर शेतकऱ्याने मंचावर गोंधळ घातला, तेवढ्यात पोलीस तिथे आले आणि त्या शेतकऱ्याला आपल्यासोबत घेऊन गेले.