शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

Vikas Dubey: उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा; विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 12:40 PM

Vikas Dubey: कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोणताही पुरावा सापडला नाहीनिवृत्त न्या. बी.एस.चौहान यांच्या चौकशी समितीचा अहवालउत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा

नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने उत्तर प्रदेशपोलिसांना क्लीन चिट दिली आहे. विकास दुबेचे बदला घेण्यासाठी एन्काऊंटर करण्यात आले होते, असा आरोप उत्तर प्रदेश पोलिसांवर करण्यात आला होता. आता मात्र क्लीन चिट मिळाल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे. (uttar pradesh police gets clean chit in vikas dubey encounter case) 

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांवर ठपका ठेवण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी.एस.चौहान यांच्या चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. आठ महिने तपास केल्यानंतर या तपास समितीने आपला अहवाल दिला आहे.  विकास दुबेने आठ पोलिसांना ठार केल्यानंतर बदला घेताना पोलिसांनी विकास दुबेला बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप होता. 

तुमचा बालहट्ट देशाच्या कामी येईल; मोदींचं देशातल्या लहानग्यांना महत्त्वाचं आवाहन

कोणताही पुरावा सापडला नाही

आठ महिने तपास केल्यानंतर न्या. बी. एस. चौहान समितीने उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांची बाजू खोटी ठरवणारा एकही साक्षीदार सापडला नसल्याचे सांगितले जात आहे. जुलै महिन्यात पोलिसांनी विकास दुबेला ठार केले होते. यावेळी त्यांनी विकास दुबे पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने ठार केल्याचे सांगण्यात आले होते.

“हवं तर हात जोडतो, पण…”; राजेश टोपे यांची नागरिकांना कळकळीची विनंती

'असा' होता घटनाक्रम

गतवर्षीच्या जुलै महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलीस आणि गुडांमध्ये चकमक झाली होती. यावेळी विकास दुबेच्या सहकाऱ्यांनी आठ पोलीस कर्मचाऱ्यांना ठार केले होते. पोलीस बिकरु गावात पोहोचले असता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. यानंतर एका आठवड्याने मध्य प्रदेशात विकास दुबेला अटक करून गाडीने उत्तर प्रदेशात आणले जात होते. यावेळी महामार्गावर पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आणि गाडी उलटली. याचा फायदा घेऊन विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

दरम्यान, या घटनेनंतर देशात खळबळ उडाली होती. विरोधकांनी योगी सरकारवर मोठे आरोप केले होते. पोलिसांनी बदला घेण्यासाठी हा एन्काऊंटर घडवून आणल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमली. 

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयyogi adityanathयोगी आदित्यनाथ