pm narendra modi appeal to children about corona situation in country | Narendra Modi: तुमचा बालहट्ट देशाच्या कामी येईल; मोदींचं देशातल्या लहानग्यांना महत्त्वाचं आवाहन

Narendra Modi: तुमचा बालहट्ट देशाच्या कामी येईल; मोदींचं देशातल्या लहानग्यांना महत्त्वाचं आवाहन

ठळक मुद्देछोटासा बालहट्ट मोठे काम करू शकतोदेशाला लॉकडाऊन पासून वाचवायचे आहेराज्य सरकारांनी शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम आहे. देशातील जनता, कोरोना रुग्ण अनेक समस्यांतून जात आहेत. कोरोना लसींचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर त्यांना भाष्य केले. (pm modi appeal to children about corona situation in country)

जनभागीदारीतून कोरोनाचे संकट परतवून लावू. या संकटाच्या काळात देशवासियांनी पुढे यावं आणि गरजवंतांना मदत करा. समाजाचा पुरुषार्थ आणि सेवाभावनेतून ही लढाई जिंकू शकू. माझी तरुणांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोरोनाचे नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसे केले तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. 

“हवं तर हात जोडतो, पण…”; राजेश टोपे यांची नागरिकांना कळकळीची विनंती

छोटासा बालहट्ट मोठे काम करू शकतो

आपल्या लहानग्यांनी घरातील मोठ्या माणसांना स्वच्छता, अनुशासन यांचे महत्त्व पटवून दिले होते. घरातील मोठ्या माणसांनी बाहेर जाऊ नये, असा हट्ट धरला होता. पाचवी, आठवी, दहावीत असणाऱ्यांना परिस्थितीविषयीचे गांभीर्य जाणतेपणाने दाखवले होते. तेच आताही अपेक्षित आहे. बालमित्रांनी कोरोनाचे गांभीर्य पुन्हा एकदा पटवून द्यावे. घरात असे वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण, विनाकाम घराबाहेर पडता कामा नये. हा तुमचा बालहट्ट मोठे काम करू शकतो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानग्यांना आवाहन केले आहे. 

देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचे आहे

प्रसारमाध्यामांनी लोकांना सतर्क करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणखी वाढवावेत. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये, याची काळजी घ्यावी. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचे आहे. देशाला लॉकडाऊनपासून वाचवणे जनतेच्या हातात आहे. राज्य सरकारांनी शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. 

केंद्रातील मोदी सरकार नफेखोरी वाढवण्याचे काम करत आहे; काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

दरम्यान, लसीकरणाचे काम जोरात सुरू आहे. जगातील सर्वात स्वस्त लस भारतात आहे. आतापर्यंत १२ कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. गरीब, शेतकरी यांसह सैनिकांनाही लस दिली जाईल. सैनिक ज्या शहरात आहेत तिथेच त्यांना लस मिळेल आणि त्यांचे कामही बंद होणार नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pm narendra modi appeal to children about corona situation in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.