"आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाचं आता काय..?"; अमेरिका 'ट्रेड डील'वर ओवेसींचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 11:09 IST2026-02-08T11:06:39+5:302026-02-08T11:09:49+5:30

Owaisi on US India Trade Deal: भारत-चीन संंबंधांबाबतही ओवैसींनी स्पष्ट मत मांडले

us india trade deal aimim asaduddin owaisi asks modi government about aatmanirbhar bharat make in india | "आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाचं आता काय..?"; अमेरिका 'ट्रेड डील'वर ओवेसींचा सरकारला सवाल

"आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाचं आता काय..?"; अमेरिका 'ट्रेड डील'वर ओवेसींचा सरकारला सवाल

Owaisi on US India Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की या व्यापार कराराचा भारतीय शेतकऱ्यांवर नकारात्मक परिणाम होईल. एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवैसी म्हणाले की सरकार अनेकदा 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया'बद्दल बोलत असते आणि प्रोडक्ट-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेद्वारे देशांतर्गत उत्पादनात लाखो कोटी रुपये गुंतवले आहेत. पण अमेरिकेशी व्यापार केल्याने आता शुल्क कमी होईल आणि भारतात अमेरिकन वस्तू जास्त येतील आणि त्याचा भारतीय उद्योगांना फटका बसू शकतो.

आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाचं पुढे काय?

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "अमेरिकेच्या व्यापार कराराअंतर्गत शुल्क कमी करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेमुळे भारतात अमेरिकन औद्योगिक वस्तूंचा पूर येईल. यामुळे स्थानिक उद्योगांना धोका निर्माण होईल. भाजप आणि RSSला आमचा प्रश्न आहे की सरकार सुरुवातीपासून जे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाबद्दल बोलत आहे, त्याचे आता काय झाले? तुम्ही उत्पादनाशी जोडलेले प्रोत्साहन योजना सुरू केली. तुम्ही लाखो कोटी रुपयांचे सार्वजनिक पैसे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वापरले. आता मात्र सरकारने अमेरिकेशी व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे. मग सरकारच्या PLI अंतर्गत येणाऱ्या क्षेत्राचे काय होईल?"

चीनबाबत काय म्हणाले?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले की आम्ही ५५० अब्ज डॉलर्सचा व्यापार करू. जर तुम्ही त्यांना अशापद्धतीचा शब्द देत असाल तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे काय होईल? येथील कृषी बाजारपेठेचे काय होईल?", असा काही बोचरे सवाल त्यांनी विचारले. "ट्रम्प म्हणतात की जर भारताने रशियाकडून थेट किंवा अप्रत्यक्षपणे तेल आयात केले तर ते भारतावर अतिरिक्त २५% कर लादतील. मला विचारायचे आहे की भारताचे पेट्रोलियम मंत्री ट्रम्प आहेत की हरदीप सिंग पुरी? ट्रम्प भारताला का धमकावत आहेत? मला कोणी शिवीगाळ केली तरी चालेल, मला काही फरक पडत नाही. पण मला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. कारण चीन या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत असून सर्वात स्वस्त तेल घेत आहे," असा दावा ओवैसी यांनी केला.

Web Title : ओवैसी ने अमेरिकी व्यापार समझौते के बीच 'मेक इन इंडिया' पर सरकार से सवाल किया

Web Summary : ओवैसी ने अमेरिकी व्यापार समझौते की आलोचना करते हुए कहा कि इससे भारतीय किसानों और उद्योगों को नुकसान होगा। उन्होंने 'आत्मनिर्भर भारत' और 'मेक इन इंडिया' पहलों के भविष्य पर सवाल उठाया, और पूछा कि कम शुल्क और बढ़े हुए अमेरिकी आयात के साथ पीएलआई क्षेत्रों का प्रदर्शन कैसा रहेगा, जबकि चीन सस्ते तेल से लाभान्वित हो रहा है।

Web Title : Owaisi Questions Government on 'Make in India' Amid US Trade Deal

Web Summary : Owaisi criticizes the US trade deal, fearing it will hurt Indian farmers and industries. He questions the fate of 'Aatmanirbhar Bharat' and 'Make in India' initiatives, asking how PLI sectors will fare with reduced tariffs and increased American imports, while China benefits from cheap oil.