२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:04 IST2025-09-30T11:02:02+5:302025-09-30T11:04:49+5:30

पी. चिदंबरम यांच्या विधानानंतर भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मुंबई हल्ल्यानंतर परदेशी दबावामुळे चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले गेले हे देशातील जनता जाणते, आता माजी गृहमंत्र्यांनी १७ वर्षांनी त्याचा स्वीकार केला असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं.

UPA govt didn’t retaliate against Pakistan after 26/11 because the MEA was against it and, USA told us not to go to war. - P. Chidambaram | २६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?

२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?

नवी दिल्ली - मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत हादरला होता. अचानक झालेल्या या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. त्यातच माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तत्कालीन यूपीए सरकारवर मुंबई हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेनंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे टाळलं. माझ्या मनात या हल्ल्याचा बदला घेण्याचा विचार होता, परंतु सरकारने सैन्य कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असं पी.चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 

एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत पी. चिदंबरम म्हणाले की, मुंबईतील हल्ल्यानंतर काही दिवसांतच मी केंद्रीय गृहमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. या हल्ल्यात १७५ हून अधिक लोकांचा जीव गेला होता. जगातील अनेक देशांतील अधिकाऱ्यांनी दिल्ली गाठत युद्ध सुरू करू नका असं म्हटलं होते. त्यावेळी कोंडोलीजा राइस ज्या तत्कालीन अमेरिकन परराष्ट्र मंत्री होत्या, त्यांनी माझी आणि पंतप्रधानांची भेट घेतली आणि प्रत्युत्तर देऊ नका असं सांगितले. मात्र हा निर्णय सरकार घेईल असं मी तेव्हा म्हटलं. आपल्याला बदला घ्यायला हवा असा विचार माझ्या मनात होता. त्यानंतर पुढे पंतप्रधान आणि इतर लोकांशीही संभाव्य कारवाईबाबत चर्चा केली होती असं त्यांनी म्हटलं. 

तसेच जेव्हा हल्ला सुरू होता, तेव्हाही पंतप्रधानांनी त्यावर चर्चा केली होती. त्यानंतर जो निर्णय झाला त्यावर परराष्ट्र मंत्रालय आणि जागतिक संघटनांचा प्रभाव दिसून येत होता. या हल्ल्यावर कुठलीही सैन्य कारवाई नको अशी आठवणही पी.चिदंबरम यांनी सांगितली. २६ नोव्हेंबर २००८ साली लश्कर ए तैय्यबाचे १० दहशतवादी मुंबईत घुसले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय, ताज हॉटेल, कामा हॉस्पिटल यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला. मुंबई पोलिसांनी एका दहशतवाद्याला पकडले. जो अजमल कसाब त्याला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली होती. 

भाजपाचा काँग्रेसवर पलटवार

दरम्यान, पी. चिदंबरम यांच्या विधानानंतर भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मुंबई हल्ल्यानंतर परदेशी दबावामुळे चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले गेले हे देशातील जनता जाणते, आता माजी गृहमंत्र्यांनी १७ वर्षांनी त्याचा स्वीकार केला असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं. तर चिदंबरम मुंबई हल्ल्यानंतर गृहमंत्रिपद सांभाळण्यासाठी तयार नव्हते. त्यांना पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करायची होती परंतु त्यांच्यावर दबाव होता असं भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आरोप केला. 

Web Title : चिदंबरम का खुलासा: 26/11 के बाद पाकिस्तान पर सैन्य कार्रवाई क्यों नहीं?

Web Summary : चिदंबरम ने खुलासा किया कि 2008 के मुंबई हमलों के बाद अंतर्राष्ट्रीय दबाव के कारण पाकिस्तान के खिलाफ सैन्य कार्रवाई नहीं की गई। जवाबी कार्रवाई की इच्छा के बावजूद, यूपीए सरकार ने वैश्विक चिंताओं के कारण कूटनीति को प्राथमिकता दी।

Web Title : Chidambaram reveals 26/11 truth: Why no military action against Pakistan?

Web Summary : P. Chidambaram disclosed that international pressure prevented military action against Pakistan after the 2008 Mumbai attacks. Despite wanting retaliation, the UPA government prioritized diplomacy due to global concerns and the Foreign Ministry's stance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.