शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात, दिब्रुगड एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरले, २ प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:19 IST

UP Railway Accident : उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे गुरवारी दुपारी एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे चंडीगड येथून आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे गुरवारी दुपारी एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे चंडीगड येथून आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त डब्यांमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. मात्र या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार चंडीगड येथून दिब्रुगडला जाणारी ट्रेन क्रमांक १५९०४ दिब्रुगड एक्स्प्रेस ही आज दुपारी २ च्या सुमारास गोंडा जंक्शन येथून पुढच्या प्रवासाला निघाली होती. मात्र काही वेळातच दुपारी २.३० च्या सुमारास गोंडापासून २० किमी अंतरावर या ट्रेनला अपघात झाला. या अपघातात ट्रेनचे दोन डबे रुळावरून पूर्णपणे घसरले. तर इतर काही डबेही अपघातग्रस्त झाले. अपघातग्रस्त डब्यांमधून प्रवाशी जीव मुठीत धरून बाहेर पडले.

दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पोलीस प्रशासनानेही अपघातस्थळी धाव घेतली आहे. वैद्यकीय पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. तसेच डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनीही या अपघाताची दखल घेतली असून, अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश