शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

लेकीसमोर बापाची निर्घृण हत्या, शरीराचे 15 तुकडे; पत्नीने प्रियकराच्या मदतीने सौरभला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:58 IST

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सौरभ राजपूत हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे.

UP Crime :उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये झालेल्या सौरभ राजपूत हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. पत्नी मुस्कान रस्तोगी हिने प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पतीची निर्दयी हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे केरुन टाकीत भरले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, चौकशीत धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. सौरभच्या हत्येनंतर सहा वर्षीय मुलगी पिहूने शेजाऱ्यांना पापा ड्रममध्ये असल्याचे सांगितले होते.

पप्पा ड्रममध्ये...चिमुकलीने केला उलगडामिळालेल्या माहितीनुसार, सौरभची पत्नी मुस्कान आणि प्रियकर साहिल यांनीच त्याची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे 15 तुकडे करून ते एका ड्रममध्ये ठेवले. इतकंच नाही तर पतीच्या हत्येनंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून मुस्कानने सौरभच्या मोबाईलवरुन त्याच्या कुटुंबीयांना मेसेज पाठवले. यादरम्यान सौरभच्या बहिणीने त्याला अनेकदा फोन केला, पण प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिला संशय आला. दरम्यान, सौरभच्या सहा वर्षांच्या मुलीने शेजाऱ्यांना पप्पा ड्रममध्ये असल्याचे सांगितले होते. हे ऐकून संशय बळावला, यानंतर सौरभच्या आईने पोलिसांना माहिती दिली.

ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडेपोलिसांचे म्हणणे आहे की, 4 मार्चच्या रात्री मुस्कानने सौरभच्या जेवणात गुंगीचे औषध दिले आणि नंतर साहिलच्या मदतीने सौरभची हत्या केली. आधी चाकूने त्याची हत्या केली, नंतर त्याचा गळा चिरला. मृतदेहाची विल्हेवाट लावणे सोपे व्हावे, म्हणून त्याचे हात कापले आणि प्लास्टिकच्या मोठ्या ड्रममध्ये भरले. इतकेच नाही, तर कुणाला मृतदेह सापडू नये किंवा संशय येऊ नये, यासाठी त्या ड्रममध्ये सिमेंट आणि वाळू टाकून पॅक केला.

कोर्टात हजेरी सुरू असताना आरोपींवर हल्ला बुधवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी संतप्त वकिलांनी दोन्ही आरोपींवर हल्ला केला. यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण मेरठमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. शवविच्छेदनानंतर सौरभ राजपूतचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला, रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस