शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:39 IST

बदायूमध्ये मुलीच्या सासऱ्यासोबतच मुलीची आई पळून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे नातेसंबंधांना धाब्यावर बसवून प्रेमसंबंधांना उत आला आहे. 

होणारा जावई आणि सासू पळून गेल्याच्या घटनेनंतर आता उत्तर प्रदेशमधून असेच नातेसंबंधातील संबंध आणि पळून जाण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बदायूमध्ये मुलीच्या सासऱ्यासोबतच मुलीची आई पळून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे नातेसंबंधांना धाब्यावर बसवून प्रेमसंबंधांना उत आला आहे. 

या महिलेच्या मुलाने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा वडील घराबाहेर जायचे तेव्हा ही महिला तिच्या मुलीच्या सासऱ्यांना काही ना काही कारण सांगून घरी बोलवायची. तसेच ते आले की ती आम्हाला दुसऱ्या खोलीत पाठवून द्यायची, असा आरोप मुलाने केला आहे. आता ते दोघे कारमध्ये बसून गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. 

मुलीच्या आईने पोलिसांकडे आपल्या पतीविरोधात तक्रार केली आहे. ममताने सांगितले की ती १५ वर्षांची असताना सुनिलसोबत लग्न झाले होते. सुनिलचे आधी एक लग्न झाले होते.  तो दारुडा होता, म्हणून माझ्या भावाला आणि वडिलांना आवडला नव्हता. त्याची पहिली पत्नी नेपाळची होती. तिचा मृत्यू झाला होता. लग्नानंतर सुनिल मला खूप मारायचा तसेच चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुळे कंटाळून मी मुलीचा सासरा शैलेंद्रसोबत घर सोडून पळून गेले, असे ममताने म्हटले आहे.

तसेच आपला मुलगा अजून लहान आहे, त्याने सुनिलच्या दबावात माझ्यावर आरोप केले आहेत. ते खोटे आहेत, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

पळून गेलेल्या सासू-जावयाचे पुढे काय झाले...

दरम्यान, सासू आणि होणाऱ्या जावयाला पोलिसांनी नेपाळ सीमेवरून पकडले असून सासूने पोलिसांना आपण जायवासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपण घरातून केवळ २०० रुपये घेऊन गेले होते, दागिने, पैशांना हातही लावला नाही, ते खोटे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे या महिलेचा पती तिला घटस्फोट देणार नसल्याचे सांगत आहे. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश