ब्रšादेवदादा माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:11+5:302015-08-02T22:55:11+5:30

सोलापूर:

The unveiling of the statue of Bravedev Mane | ब्रšादेवदादा माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण

ब्रšादेवदादा माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण

लापूर:
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता सहकार तपस्वी स्व़ ब्रšादेवदादा माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली़
या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री पतंगराव कदम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ मधुकरराव चव्हाण यांच्यासह जिल्‘ातील आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत़
बाजार समितीच्या जडणघडणीत स्वर्गीय बाबुराव चाकोते, स्व. वि. गु. शिवदारे, स्व. भीमराव पाटील व स्व. ब्रšादेवदादा माने यांचे मोलाचे योगदान आहे. दादांचा पूर्णाकृती पुतळा मिरज येथील विजय गुजर यांनी तयार केला आहे. ३ ऑगस्ट रोजी बाजार समितीच्या आवारात पुतळा अनावरणानंतर शेतकरी मेळावा होणार आहे. जिल्‘ातील शेतकर्‍यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीप माने यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)

शु्रकवारी हॅलो पान एक वर ब्रम्हदेवदादांचा फोटो प्रसिध्द झाला आहे़

Web Title: The unveiling of the statue of Bravedev Mane