शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

ॅशिवाजी विद्यापीठातील निवडणुकीचा वाद रंगला

By admin | Updated: August 23, 2014 00:08 IST

निवेदन, पत्रकबाजी सुरू : विद्यापीठ प्रतिनिधी- विद्यार्थी संघटना आमने-सामने

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील अधिविभागीय विद्यार्थी मंडळाचा वाद रंगला असून त्यात विद्यापीठ प्रतिनिधी, संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्या आहेत. त्यात नि:पक्षपातीपणे निवडणूक प्रक्रिया पार पडली असल्याने फेरनिवडणूक घेऊ नये, या मागणीचे निवेदन विद्यापीठ प्रतिनिधी व संशोधक विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिले आहे. दुसरीकडे ‘गायकवाडसाहेब, हाच का तुमचा विद्यार्थीभिमुख कारभार?’ असा सवाल करत आॅल इंडिया स्टुडंटस फेडरेशन (एआयएसएफ) आणि आॅल इंडिया यूथ फेडेरशनचा (एआयवायएफ) उल्लेख असलेल्या पत्रकाद्वारे फेरनिवडणूक झालीच पाहिजे, अशी मागणी काहींनी केली आहे.गेल्या आठवड्यात महाविद्यालय, विद्यापीठातील अधिविभागीय विद्यार्थी मंडळाच्या विद्यापीठ प्रतिनिधी, सचिवपदाच्या निवडणुका झाल्या. यावेळी अधिविभागीय विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत पक्षपातीपणा झाल्याचा आरोप करत ‘एआयएसएफ’ आणि राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेने संबंधित निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर बुधवारी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील आणि विद्यापीठ अधिविभाग विद्यार्थी प्रतिनिधी आणि संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने फेरनिवडणूक घेण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना दिले. निवेदनात असे म्हटले आहे की, विद्यापीठातील अधिविभागीय विद्यार्थी मंडळाची निवडणूक प्रक्रिया कायद्यानुसार तसेच नि:पक्षपातीपणे घेतली आहे. मात्र, काही विद्यार्थी आणि नेतेमंडळींनी या निवडणुकीमध्ये आक्षेप नोंदविला.निकालानंतर काहीजणांनी विद्यापीठात घातलेला दंगा आणि त्यांच्या कृतीचा निषेध करत आहोत. निवडणूक पारदर्शकपणे झाल्याने फेरनिवडणूक घेण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. या शिष्टमंडळात विद्यापीठ प्रतिनिधी कोणार्क शर्मा, श्वेता परूळेकर, विवेक कोकरे, बाळासाहेब मकर, नितीन पाटील, विशाल कापसे, दीपक लाड, अमोल पांढरे, सुजितकुमार थिटे, सागर शिंदे, आशिष जाधव, संकेत शिंदे, राहुल मगदूम, किशोर सुतार, सागर चव्हाण, रामचंद्र गलंडे, दीपक कांबळे, समाधान गायकवाड, कौस्तुभ कांबळे, राहुल तांबीरे, श्रावण कांबळे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)