केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या तफ्यावरील हल्ला प्रकरण; 8 जणांना अटक; 3 पोलीस कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:12 PM2021-05-06T22:12:45+5:302021-05-06T22:13:25+5:30

मुरलीधरन यांनी ट्विटरवर आरोप केला होता, की त्यांच्या ताफ्यावरील हल्ल्यामागे ‘टीएमसीच्या गुंडां’चा हात आहे.

Union minister V Muraleedharan convoy attacked eight arrested and three policemen suspended | केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या तफ्यावरील हल्ला प्रकरण; 8 जणांना अटक; 3 पोलीस कर्मचारी निलंबित

केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या तफ्यावरील हल्ला प्रकरण; 8 जणांना अटक; 3 पोलीस कर्मचारी निलंबित

Next

कोलकाता - पश्चिम बंगाल दौऱ्यावरील केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन (V Muraleedharan) यांच्या ताफ्यावर गुरूवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून 3 पोलिसांनाही निलंबित करण्यात आले आहे. मुरलीधरन हे बंगालमध्ये 2 मेरोजी जाहीर झालेल्या निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संबंधित भागाचा दौरा करत होते. (Union minister V Muraleedharan convoy attacked eight arrested and three policemen suspended)

पश्चिम मेदिनीपूरचे एसपी दिनेश कुमार यांनी म्हटले आहे, की केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या कारवरील हल्ल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना जणांना निलंबित करण्यात आले आहे. 

मुरलीधरन यांनी ट्विटरवर आरोप केला होता, की त्यांच्या ताफ्यावरील हल्ल्यामागे ‘टीएमसीच्या गुंडां’चा हात आहे. मुरलीधरन म्हणाले, “मी पश्चिम मिदनापूरमध्ये पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला आणि ज्यांच्या घरात तोडफोड करण्यात आली, त्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मी ताफ्यासह एका घरून दुसऱ्या घरी जात होतो आणि त्याच वेळी लोकांचा एक गट अचानकपणे आमच्याकडे चालून आला आणि हल्ला केला. 

नव्या संसदेसाठी हजारो कोटी रुपये, मग लसीकरणाला पैसै नाहीत का? ममतांचा हल्लाबोल

मुरलीधरन यांनी ‘पीटीआय’ या वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले, की “मी सुरक्षित आहे. मात्र, माझा चालक जखमी झाला आहे. काही गाडीच्या खिडक्या तुटल्या आहेत.” तसेच मुरलीधरन यांच्या सोबत असलेले भाजपचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी, पोलिसांच्या उपस्थितीत हा हल्ला झाल्याचा दावा केला होता.

तत्पूर्वी, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटरून एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये काही लोक त्यांच्या ताफ्यावर हल्ला करत असल्याचे दिसत आहे. याबरोबरच, "पश्चिम मिदनापूरमध्ये तृणमूलच्या गुंडांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला. गाडीच्या काचा फुटल्या. माझ्यासोबतच्या कर्मचाऱ्यांवरदेखील हल्ला झाला. यामुळे दौरा आटोपता घेण्यात आला" असे मुरलीधरन यांनी म्हटले होते.

Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला!

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Union minister V Muraleedharan convoy attacked eight arrested and three policemen suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app