Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 07:42 PM2021-05-06T19:42:10+5:302021-05-06T19:42:21+5:30

Assam Assembly Election 2021: आसाममध्ये भाजपाला बहुमतासह विजय मिळाल्यानंतरही पक्षाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. 

Assam Assembly Election 2021: 'zero' got in Muslim-majority areas, BJP dissolves minority Cells! | Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला!

Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला!

googlenewsNext

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला संमिश्र यश मिळाले होते. (Assam Assembly Election 2021 )आसाम आणि पाँडेचेरीमध्ये भाजपाचा विजय झाला. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आसाममध्ये भाजपाला बहुमतासह विजय मिळाल्यानंतरही पक्षाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. ( 'zero' got in Muslim-majority areas, Assam BJP dissolves minority Cells)

आसाममध्ये भाजपाला बहुमत मिळाले असले तरी मुस्लिम बहुल भागात भाजपाची कामगिरी निराशाजनक झाली. मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेल्या आठ मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात भाजपाला विजय मिळू शकला नाही. त्यामुळे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीने राज्यातील अल्पसंख्याक मोर्चाच्या सर्व शाखा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने मुस्लिम बहुल भागातील आठ मतदारसंघात भाजपाने आठ उमेदवार दिले होते. मात्र या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला. भाजपाला अनेक बुथवर २० हून कमी मते मिळाली. ही मते भाजपाच्या बुथ कमिटी मेंबर्सपेक्षाही कमी होती. त्यामुळे अखेरीच प्रदेश कार्यकारिणीने कठोर निर्णय घेतला आहे. 

याबाबत भाजपाचे आसाममधील प्रदेशाध्यक्ष रंजित दास यांनी सांगितले की, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या राज्य, जिल्हा आणि मंडळ स्तरावरील सर्व शाखा तात्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात येत आहेत. आमच्या पक्षाच्या महिला, युवा, एससी आणि इतर विविध कार्यकारणी आहेत. तसाच अल्पसंख्याक मोर्चाही आहे. आम्ही अल्पसंख्याकांचे प्राबल्य असलेल्या काही मतदारसंघात उमेदवार दिले होते. मात्र या मतदारसंघांमधील अनेक बुथवर आमच्या उमेदवारांना २० मतेही मिळाली नाहीत, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र दरम्यान, भाजपा राज्य अल्पसंख्याक मोर्चाचे प्रमुख मुख्तार हुसेन खान यांनी या निर्णयामागचे नेमके कारण काय आहे माहिती नाही. पक्षाला अनेक ठिकाणी अपेक्षेएवढी मते मिळाली नाहीत, असे सांगितले.  
१२६ सदस्य असलेल्या आसाममध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ७५ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाजोतला ५० जागा मिळाल्या. उर्वरित एका जागेवर सामाजिक कार्यकर्ते अखिल गोगोई यांनी विजय मिळवला होता. 
 

Web Title: Assam Assembly Election 2021: 'zero' got in Muslim-majority areas, BJP dissolves minority Cells!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.