नव्या संसदेसाठी हजारो कोटी रुपये, मग लसीकरणाला पैसै नाहीत का? ममतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 09:32 PM2021-05-06T21:32:09+5:302021-05-06T21:33:12+5:30

आता जर मंत्री येत असतील, तर त्यांनाही विशेष उड्डाणांसाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आणावा लागेल. सर्वांसाठी नियम समानच असायला हवेत.

CM Mamta banerjee says corona Virus increased in bengal due to repeated visits of bjp leaders | नव्या संसदेसाठी हजारो कोटी रुपये, मग लसीकरणाला पैसै नाहीत का? ममतांचा हल्लाबोल

नव्या संसदेसाठी हजारो कोटी रुपये, मग लसीकरणाला पैसै नाहीत का? ममतांचा हल्लाबोल

Next

कोलकाता - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची धुरा हाती घेतली आहे. यानंतर आता त्यांनी थेट केंद्राच्या कोरोना नीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्राकडे कोरोनासंदर्भात कुठल्याही प्रकारची पारदर्शक नीती नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिली आहे. यात, त्यांनी अधिक चांगले धोरण तयार करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे, असे ममता म्हणाल्या. याच बरोबर, भाजपच्या लोकांनी बंगालमध्ये येऊन कोरोना पसरवला, असा आरोप करत, अद्याप राज्याला पुरेशा लशी मिळालेल्या नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. (CM Mamta banerjee says corona Virus increased in bengal due to repeated visits of bjp leaders) 

ममता म्हणाल्या, भाजप नेते राज्यात फिरत आहेत. येथील जनतेला भडकावत आहेत. नव्या सरकारला अद्याप 24 तासही झालेले नाहीत आणि ते पत्र पाठवत आहेत, टीम आणि नेते येत आहेत. ममता म्हणाल्या, ते खरोखरच जनादेश स्वीकारायला तयार नाहीत. मी त्यांना लोकांचा जनदेश स्वीकारण्याची विनंती करते.

ममता म्हणाल्या, एक टीम आली होती, त्यांनी चहा पिला आणि ते परत निघून गेले. सध्या कोरोना परिस्थिती आहे. आता जर मंत्री येत असतील, तर त्यांनाही विशेष उड्डाणांसाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आणावा लागेल. सर्वांसाठी नियम समानच असायला हवेत. एवढेच नाही, तर भाजप नेते नेहमी-नेहमी येथे येत असल्याने राज्यात कोरोना वाढत आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 
 
लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना ममता म्हणाल्या, मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी अद्याप आपल्याला कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही. ते 20,000 कोटी रुपये खर्च करून नवी संसद आणि पुतळे तयार करत आहेत. मात्र, लशीसाठी 30,000 कोटी रुपयांची व्यवस्था करू शकत नाहीत. 

याच वेळी ममतांनी पीएम केअर फडावरही भाष्य केले. पीएम केअर फंड कुठे आहे? ते तरुण वर्गाचा जीव का धोक्यात टाकत आहेत? त्यांच्या नेत्यांनी इकडे-तिकडे जाण्याऐवजी कोरोना रुग्णालयांचा दौरा करायला हवा, असे ममता म्हणाल्या.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CM Mamta banerjee says corona Virus increased in bengal due to repeated visits of bjp leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app