स्मृती ईरानींनी आपल्या डॉगीसोबत शेअर केला फोटो, म्हणाल्या- "जब साडा कुत्ता टॉमी नहीं...!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 19:00 IST2021-03-03T18:59:08+5:302021-03-03T19:00:05+5:30
स्मृती यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत त्यांचा डॉगीही (dog ) दिसत आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. (Smriti Irani shared picture with her dog)

स्मृती ईरानींनी आपल्या डॉगीसोबत शेअर केला फोटो, म्हणाल्या- "जब साडा कुत्ता टॉमी नहीं...!"
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी (Smriti Irani) सोशल मिडियावर सातत्याने अॅक्टीव्ह असतात. त्या सोशल मिडियावर अनेक वेळा अपले मतही व्यक्त करत असतात. यावेळी स्मृती यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत त्यांचा डॉगीही (dog ) दिसत आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. (Union minister Smriti Irani shared picture with her dog and says when sadda kutta is not tommy but sheru)
इंस्टाग्रामवर पोस्ट केला फोटो... -
आपण फोटोत पाहू शकता, की स्मृतींसोबत त्यांचा डॉगी दिसत आहे. त्यांचा हा फोटो त्यांच्या घरातील वाटत आहे. फोटोलत आपण बघू शकता, की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्मृती यांनी मास्कचाही वापर केला आहे. तसेच त्यांनी आपल्या डॉगीला प्रेमाणे पकडले आहे. आपला हा फोटो शेअर करत स्मृती यांनी लिहिले आहे, "जेव्हा तुमचा कुत्रा टॉमी नाही शेरू आहे."
जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत...
फॅन्सच्याही आल्या प्रतिक्रिया -
स्मृती यांनी शेअर केलेल्या या फोटोवर त्यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. येथे एका चाहत्याने कमेंट करत म्हटले आह, की "आपला शेरू फारच सुंदर आहे." तर, दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले आहे, हार्ट इमोजी बनवली आहे. नुकत्याच स्मृती वाराणसी दौऱ्यावर गेल्या होत्या. तेथे त्यांनी पक्षातील सहकाऱ्यांसोबत बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले.
पश्चिम बंगाल निवडणूक: काल सीएम ममता तर आज स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर, असा होता अंदाज
पश्चिमबंगालमध्ये स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर -
सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण जबरदस्त तापले आहे. गेल्या आठवड्यात भाजप नेत्या तथा मंत्री स्मृती इराणी यांनीही पश्चिम बंगालमध्ये रॅली केली. यावेळी स्मृती ईरानी यांनी स्कूटरवर बसून रॅलीचे नेतृत्व केले. भाजपच्या राज्यव्यापी ‘परिवर्तन यात्रे’त भाग घेत, गंगाजोआरा येथे स्मृती ईरानी यांनी भाजप खासदार रूपा गांगुली तसेच अग्निमित्रा पॉल यांच्यासह पक्षाच्या रथावर स्वार होऊन अभियानाची सुरुवात केली. काही वेळानंतर त्या रथातून उतरल्या आणि स्कूटरवर स्वार झाल्या. यावेळी त्यांनी काळ्या रंगाचे हेल्मेट घातले होते आणि मास्कदेखील लावला होता.