पश्चिम बंगाल निवडणूक: काल सीएम ममता तर आज स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर, असा होता अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 10:35 PM2021-02-26T22:35:53+5:302021-02-26T22:39:33+5:30

भाजपच्या राज्यव्यापी ‘परिवर्तन यात्रे’त भाग घेत, गंगाजोआरा येथे स्मृती ईरानी यांनी भाजप खासदार रूपा गांगुली तसेच अग्निमित्रा पॉल यांच्यासह पक्षाच्या रथावर स्वार होऊन अभियानाची सुरुवात केली. काही वेळानंतर त्या रथातून उतरल्या आणि स्कूटरवर स्वार झाल्या. (West bengal election)

West bengal election BJP leader smriti irani drives scooty in her roadshow | पश्चिम बंगाल निवडणूक: काल सीएम ममता तर आज स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर, असा होता अंदाज

पश्चिम बंगाल निवडणूक: काल सीएम ममता तर आज स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर, असा होता अंदाज

Next

सोनारपूर -पश्चिम बंगालच्या (West bengal) दक्षिण 24 परगना जिल्ह्यात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आज भाजप नेत्या तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (smriti irani) रस्त्यावर उतरल्या. यावेळी स्मृती ईरानी यांनी स्कूटरवर बसून रॅलीचे नेतृत्व केले. भाजपच्या राज्यव्यापी ‘परिवर्तन यात्रे’त भाग घेत, गंगाजोआरा येथे स्मृती ईरानी यांनी भाजप खासदार रूपा गांगुली तसेच अग्निमित्रा पॉल यांच्यासह पक्षाच्या रथावर स्वार होऊन अभियानाची सुरुवात केली. काही वेळानंतर त्या रथातून उतरल्या आणि स्कूटरवर स्वार झाल्या. यावेळी त्यांनी काळ्या रंगाचे हेल्मेट घातले होते आणि मास्कदेखील लावला होता.

VIDEO: ...इलेक्ट्रिक स्कूटी चलावताना पडता-पडता थोडक्यात बचावल्या ममता बॅनर्जी! सुरक्षा रक्षकांनी असं सावरलं

ईरानी म्हणाल्या, ''आज आम्ही रथयात्रा सुरू केल्यानंतर, प्रशासनाने जाणून बुजून उशीर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही दूचाकी वाहन चालवत जाऊ, पायी चालू कारण पश्चिम बंगाल बदलासाठी पुढे अग्रेसर झाला आहे.'' स्मृती ईरानी दूचाकीवर बसल्यानंतर उत्साहित झालेले अनेक भाजप कार्यकर्ते दूचाकीवर स्वार होऊन निघाले. यावेळी ''जय श्री राम'' तथा ''खेला होबे'' अशा घोषणांनी आकाश दणाणून गेले होते. खेला होबे ही घोषणा सर्वप्रथम तृणमूल काँग्रेसने दिली होती. ही घोषणा आता या निवडणूक काळात सामान्य झाली आहे.

स्मृती म्हणाल्या, ''मी तुमचे आभार मानते. आम्ही तुमचा आशिर्वाद घेण्यासाठी बाहेर पडलो आहोत. आपण यापूर्वीच नरेंद्र मोदींना संधी दिली आहे आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान भाजप आणि कमळाला आशिर्वाद दिले आहेत.''

VIDEO : 'मंत्री चालवत होते स्कूटर, मागे बसल्या होत्या मुख्यमंत्री', पेट्रोल-डिझेल दरवाढीचा असाही विरोध!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात स्कूटरची सवारी केली होती -
ईरानींच्या या बाइक रॅलीच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात स्कूटरची सवारी केली होती. त्या इलेक्ट्रिक स्कूटरवरून राज्य सचिवालय ‘नबान्न’ येथे गेल्या होत्या. ही स्कूटर राज्य सरकारमधील मंत्री आणि कोलकाता शहराचे मेयर फरहाद हकीम चालवत होते.

Web Title: West bengal election BJP leader smriti irani drives scooty in her roadshow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.