शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

मधुचंद्राच्या वाटेवर नववधूचा दुर्दैवी अंत

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

( ऋचा निंबर्तेचा फोटो रॅपवर टाकला आहे)

( ऋचा निंबर्तेचा फोटो रॅपवर टाकला आहे)

मधुचंद्राच्या वाटेवर नववधूचा दुर्दैवी अंत
पती जखमी : कार दरीत कोसळली
नागपूर : लग्नानंतर सिमला येथे मधुचंद्रासाठी जाणाऱ्या छोटी धंतोली येथील नवदाम्पत्याची कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात नववधू जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजता घडली. लग्नाला दहा दिवसही उलटले नसताना ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राहुल निंबर्ते (२४) आणि ऋचा माटे (२०) रा. छोटी धंतोली यांचे ९ फेब्रुवारी २०१५ रोजी सेंट्रल बाजार रोडवरील गणेश लॉन बजाजनगर येथे विवाह झाला. लग्नानंतर ते मधुचंद्रासाठी सिमला येथे जात होते. नागपूरवरून विमानाने ते दिल्लीला गेले. तेथून ते इनोव्हा कारने सिमल्याला जात होते. सिमल्याला जाण्यापूर्वी दोन किलोमीटरपूर्वी त्यांची इनोव्हा कार दरीत कोसळली. या अपघातात नववधू ऋचाचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती राहुल आणि इनोव्हा गाडीचा चालक जखमी झाले. त्यांना सिमल्याच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी नागपुरात धडकताच कुटुंबात शोककळा पसरली.