शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ही तर अनिती व दुर्नीती; विरोधी पक्षांचा कडाडून हल्ला

By admin | Updated: January 2, 2015 02:27 IST

योजना आयोगाचे नाव नीती करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर हल्ला चढविताना विरोधी पक्षांनी हा निर्णय दिखावू व वरकरणी असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : योजना आयोगाचे नाव नीती करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर हल्ला चढविताना विरोधी पक्षांनी हा निर्णय दिखावू व वरकरणी असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे राज्यांसोबत भेदभावाचे धोरण राबविले जाण्याची व धोरणे ठरवताना कॉर्पोरेट््सचा प्रभाव राहण्याची भीती व्यक्त केली. माकपाचे नेते सीताराम येचुरी यांनी आयोगाचे नाव बदलण्याच्या घटनेचे दुर्नीती अशा शब्दात वर्णन केले. सरकार जर २०१५ च्या आधी जनतेचे वरकरणी व दिखावू गोष्टींनी अभिनंदन करू इच्छित असेल तर त्यावर आपण काही भाष्य करू शकत नाही असे म्हटले. सरकारच्या या पावलामुळे पंतप्रधानांचे कार्यालय व अर्थ मंत्रालयाची आर्थिक उद्दिष्ट वसरकारी तिजोरीबाबतची दृष्टी अधू असल्याचे स्पष्ट होते असेही त्यांनी म्हटले आहे. राज्य व केंद्रादरम्यान वादाची स्थिती असताना नीती अंतिम निर्णय घेईल तेव्हा राज्यांसोबत अन्याय होण्याची शक्यता आहे असेही ते पुढे म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी, नीतीच्या निर्णयांमधून राज्यांमध्ये भेदभाव केला जाण्याची शक्यता बोलून दाखविली. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी पुढे, योजना आयोग योजना बनवीत होता. त्याचे नाव नीती ठेवून सरकार कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे असा सवाल केला.योजना आयोगाच्या पुनर्गठनाचा विरोध काँग्रेसने सैद्धांतिक आधारावर केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. हा युद्ध करण्याचा मुद्दा नाही तर ती सिद्धांताची बाब आहे. विरोधी पक्षात असताना भाजपा संघवादाबाबत भरभरून बोलत होता आणि आता सत्तेत आल्यानंतर त्याच्या विरुद्ध काम करीत आहे असेही ते यावेळी म्हणाले. भाकपाचे ज्येष्ठ नेते गुरुदास दासगुप्ता यांनी, योजना आयोगाला संपुष्टात आणून नीती आयोग नावाची नवी संस्था निर्माण केल्याने अनियमित अर्थव्यवस्थेचा मार्ग प्रशस्त होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा नाव बदलण्याचा प्रकार नाही, सरकारने योजना आयोगाला संपविले कारण त्याचा योजनेवरच विश्वास नाही. तृणमूलच्या सौगत राय यांनी, योजना आयोगाला संपविण्यामुळे अर्थव्यवस्था अनियोजित होईल व त्यामुळे कॉर्पोरेट््सची चलती राहील असे म्हटले आहे. मी योजना आयोगाला संपविण्याच्या विरोधात आहे. जो इतक्या वर्षांपासून देसात काम करीत होता, आपण योजनाबद्ध अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवून वाटचाल करीत होतो. मात्र सरकारच्या या पावलाने अर्थव्यवस्था अनियोजित होईल अशी पुस्ती त्यांनी जोडली. च्काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी, नीतीच्या निर्णयांमधून राज्यांमध्ये भेदभाव केला जाण्याची शक्यता बोलून दाखविली. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनीआयोगाचे नाव नीती ठेवून सरकार कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे असा सवाल केला. योजना आयोगाच्या पुनर्गठनाचा विरोध काँग्रेसने सैद्धांतिक आधारावर केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.