एकमेकांसोबत लग्न न झाल्याने प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल; दोघांनीही एकसाथ संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 05:46 PM2023-02-05T17:46:10+5:302023-02-05T17:47:02+5:30

उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Unable to marry each other, the lovers ended their lives in Udham Singh Nagar district of Uttarakhand  | एकमेकांसोबत लग्न न झाल्याने प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल; दोघांनीही एकसाथ संपवलं जीवन

एकमेकांसोबत लग्न न झाल्याने प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल; दोघांनीही एकसाथ संपवलं जीवन

googlenewsNext

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यात एका तरुणाचा आणि महिलेचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुण व तरूणी दोघेही विवाहित असून दोघांनाही एक-एक मुलगा आहे. खरं तर ही महिला तिच्या माहेरी आली होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते पण कौटुंबिक दबावामुळे लग्न होऊ शकले नाही, असे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तरुणीचे किच्छा येथे तर तरुणाचे लग्न पिलीभीत येथे झाले होते. दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर त्यांना काळजी वाटू लागली. पहाटे दीडच्या सुमारास दोघेही आपापल्या घरातून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर प्रियकराने मुलीच्या भावाला फोन केला होता. त्यात तो म्हणाला की आम्ही दोघे खूप पुढे जात आहोत. त्यानंतर रात्रीच मुलीच्या नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला मात्र दोघेही सापडले नाहीत. सकाळी गावातील झाडाला दोन मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

पोलिसांकडून अधिक तपास सुरू 
स्थानिक पुलभट्टा पोलीस ठाण्याचे प्रमुख कमलेश भट्ट यांनी सांगितले की, सकाळी साडेसहा वाजता गावकऱ्यांनी त्यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलीस दोन्ही कुटुंबांची चौकशी करत आहेत. दोघांचे कॉल डिटेल्सही काढले जात आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: Unable to marry each other, the lovers ended their lives in Udham Singh Nagar district of Uttarakhand 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.