उमरेड अपघात

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:01+5:302014-12-25T22:41:01+5:30

दोन दुचाकीची समोरासमोर धडक

Umared Accident | उमरेड अपघात

उमरेड अपघात

न दुचाकीची समोरासमोर धडक
उमरेड : दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक बसून त्यात पाच जण जखमी झाले. हा अपघात खेडी शिवारात बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झाला. एमएच-४०/एडी-६५१६ क्रमांकाच्या मोटरसायकलने राकेश भीमराव मालके (१७, रा. जोगीठाणा, उमरेड) हा तारणाकडे जात होता. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-३१/बीजी-५९५५ भरधाव मोटरसायकलने पहिल्या मोटरसायकलला जबर धडक दिली. त्यात दोन्ही मोटरसायकलवरील पाच जण जखमी झाले. त्यांना लगेच ग्रामीण रुग्णालयात भरती केले. अपघात होताच ५९५५ क्रमांकाच्या मोटरसायकलचा चालक तेथून पसार झाला. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार मोटरसायकलचालकाचा शोध उमरेड पोलीस घेत आहे.

Web Title: Umared Accident