शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

उदयपूर मर्डरमध्ये मोठा खुलासा; आरोपींचे पाकिस्तान कनेक्शन, 45 दिवस कराचीत ट्रेनिंगही घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 19:21 IST

Udaipur Murder: राजस्थानच्या उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल हत्याकांडात दोन्ही आरोपींचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे. राजस्थानचे गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांनी याला दुजोरा दिला.

उदयपूर:राजस्थानच्या उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल हत्याकांडात दोन्ही आरोपींचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे. राजस्थानचे गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांनी याला दुजोरा दिला. हे दोन धर्मातील भांडणाचे प्रकरण नसून दहशतवादी हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. दोन आरोपींपैकी एक मोहम्मद घौस 2014-15 मध्ये कराचीला 45 दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानशी संबंधएवढेच नाही तर 2018-19 मध्ये घौस मोहम्मद अरब देशांमध्ये गेला होता. गेल्या वर्षी तो नेपाळला गेल्याचेही समोर आले आहे. अशा परिस्थितीत आरोपी घौस मोहम्मदचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी आहे, त्यामुळे राजस्थान सरकारने आता संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवले आहे. विशेष म्हणजे, आरोपी घौस मोहम्मद आणि रियाज जब्बार हे दोघेही सतत पाकिस्तानात बसलेल्या लोकांच्या संपर्कात होते आणि दोघेही पाकिस्तानच्या 8 ते 10 क्रमांकावर सतत बोलत होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

आरोपींना फाशी मिळणारमंत्री राजेंद्र यादव म्हणाले, 'उदयपूरची ही घटना म्हणजे परदेशात बसलेल्या दहशतवादी शक्तींचा भारतातील शांतता बिघडवण्याचा आणि हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा सुनियोजित कट होता. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत घेऊन दोन्ही आरोपींना पकडले, त्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. यासोबतच या पाचही जणांना प्रमोशन मिळणार आहे. यासोबतच मंत्री राजेंद्र यादव म्हणाले की, ही घटना अचानक घडली आहे, त्यामुळे ही बाब पूर्णपणे गुप्तचर यंत्रणेचे अपयश मानता येणार नाही. या जघन्य गुन्ह्याची शिक्षा फाशीपेक्षा कमी होणार नाही.

UAPA कायद्यान्वये गुन्हा दाखलराजस्थानचे डीजीपी एमएल लाथेर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उदयपूरमधील टेलर कन्हैयालालची हत्या ही दहशतवादी घटना मानून यूएपीए कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींच्या अन्य देशांतील संपर्कांचीही माहिती समोर आली आहे. कन्हैयालालच्या हत्येचा आरोप असलेला घौस मोहम्मद हा 2014 साली पाकिस्तानातील कराची शहरात गेला होता, असेही राज्याचे पोलीस प्रमुख लाथेर यांनी सांगितले. तो दावत-ए-इस्लामी नावाच्या संघटनेशी संबंधित होता. उत्तर प्रदेशातील कानपूरसह दिल्ली आणि मुंबईमध्ये दावत-ए-इस्लामीची कार्यालये असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला