शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

भरमसाट दंडापासून वाचण्यासाठी दुचाकीस्वाराची 'भन्नाट डोक्यालिटी' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 22:00 IST

मी कुठेही जाण्यापूर्वी किंवा दुचाकीवर बसण्यापूर्वी हेल्मेट परिधान करतो

ठळक मुद्देमी कुठेही जाण्यापूर्वी किंवा दुचाकीवर बसण्यापूर्वी हेल्मेट परिधान करतोदुसरीकडे हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांकडून 500 रुपयांचा दंड वसुल करुन, पोलिसांकडून त्यांस एक हेल्मेट भेट देण्यात येत आहे.

अहमदाबाद - गुजरातच्या वडोदरा येथील एका नागरिक प्रवाशाने ट्रॅफिक पोलिसांपासून आणि दंडाच्या रकमेपासून वाचण्याचा चांगला उपाय केला आहे. राम शहा असे या व्यक्तीचे नाव असून नवीन ट्रॅफिक नियमांनुसार लावण्यात येणाऱ्या दंडाची भरपाई करण्याची वेळ येऊ नये म्हणून, चक्क आपल्या हेल्मेटलाच ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे चिकटवली आहेत. 

मी कुठेही जाण्यापूर्वी किंवा दुचाकीवर बसण्यापूर्वी हेल्मेट परिधान करतो. त्यामुळे, मी हेल्मेटवरच सर्व कागदपत्रे चिकटवली आहेत. कारण, नवीन ट्रॅफिक नियमानुसार दंडाची कारवाई होऊ नये, असे मला वाटत असल्याचे शहा यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे राम शहांना या अवतारात पाहिल्यानंतर ट्रॅफिक पोलीसही त्यांना न अडवता पुढे जाऊ देतात. शहा यांची ही भन्नाट आयडिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर राम शहांचा हेल्मेट परिधान केलेला फोटोही व्हायरल होत आहे. 

दरम्यान, दुसरीकडे हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांकडून 500 रुपयांचा दंड वसुल करुन, पोलिसांकडून त्यांस एक हेल्मेट भेट देण्यात येत आहे. तर, नियमांचे पालन करुन वाहन चालविणाऱ्या सजग नागरिकांस थँक यू कार्ड भेट देण्यात येत आहे. नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत पाचपट दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हा कायदा लागू करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसGujaratगुजरात