चोरट्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी कुरुलमधील घटना: चोरटे सलगर वस्ती येथील रहिवासी

By Admin | Updated: July 31, 2015 00:22 IST2015-07-31T00:22:57+5:302015-07-31T00:22:57+5:30

मोहोळ : चोरी करण्याच्या उद्देशाने सौंदणे (ता. मोहोळ) येथे जीपमध्ये आलेल्या चोरट्यांना तरुणांनी हुसकावून लावल्यानंतर ते पसार झाले. दरम्यान, हे चोरटे कुरुल चौकात आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडविताच, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. हे चोरटे सलगर वस्ती, सोलापूर येथील रहिवासी आहेत.

Two policemen injured in thugs attack in Kurul: Residents of Chorte Salgar Vasti | चोरट्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी कुरुलमधील घटना: चोरटे सलगर वस्ती येथील रहिवासी

चोरट्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी कुरुलमधील घटना: चोरटे सलगर वस्ती येथील रहिवासी

होळ : चोरी करण्याच्या उद्देशाने सौंदणे (ता. मोहोळ) येथे जीपमध्ये आलेल्या चोरट्यांना तरुणांनी हुसकावून लावल्यानंतर ते पसार झाले. दरम्यान, हे चोरटे कुरुल चौकात आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडविताच, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. हे चोरटे सलगर वस्ती, सोलापूर येथील रहिवासी आहेत.
सौंदणे येथे चोरी करण्यासाठी आठ ते दहा चोरटे गावात शिरले. तरुणांना याबाबत संशय आल्यानंतर चोरट्यांचा पाठलाग करीत हुसकावून लावले. तरुणांनी तांबोळे, सौंदणे, टाकळी सिकंदर, कुरुलपर्यंत पाठलाग केला. दरम्यान, पोलिसांनीही फोन करून याबाबत माहिती दिली. चोरट्यांची गाडी कुरुल चौकात आल्यानंतर पोलिसांनी जीप अडविताच चोरट्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये दोघे पोलीस जखमी झाले असून, जीपसह आठ ते दहा चोरट्यांना ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. हे चोरटे सोलापूरच्या सलगर वस्ती परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. तपास सपोनि संजीव झाडे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two policemen injured in thugs attack in Kurul: Residents of Chorte Salgar Vasti