शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूचे आणखी दोन बळी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

सहा जण व्हेंटिलेटरवर : लागण झालेले नवे १२ रुग्ण सापडले

सहा जण व्हेंटिलेटरवर : लागण झालेले नवे १२ रुग्ण सापडले

पुणे : स्वाइन फ्लूच्या बळींचे सत्र शहरात वेगाने वाढले असून शनिवारी आणखी दोघांचा या आजाराने बळी घेतला. यामुळे अवघ्या दीड महिन्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १४ वर पोहोचली आहे. दरम्यान, लागण झालेल्या ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर आज दिवसभरात स्वाइन फ्लूची लागण झालेले १२ नवे रुग्ण सापडले आहेत.
मृत्यू झालेल्यांपैकी ४० वर्षीय महिला पिंपरी-चिंचवड येथील केळेवाडी येथे राहणारी होती तर २४ वर्षीय मुलगा येरवडा येथे राहणारा होता. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या दोघांचा आज सकाळी मृत्यू झाला. या दोघांनाही स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले होते.
दरम्यान, पुण्यात स्वाइन फ्लू झपाटयाने वाढू लागला असून राज्यशासनाच्या आरोग्य विभाग व पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. केवळ जनजागृतीवरच भर दिला जात आहे. त्याचा परिणाम होत नसल्याचे रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. आज दिवसभरात ९५९ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४३ संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली. यापैकी ३१ जणांच्या घशातील कफांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. लागण झालेले २९ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे. उपचाराने पूर्णपणे बरे झालेल्या ९ जणांना आज रुग्णालयांमधून घरी सोडण्यात आले.
--------
स्वाइन फ्लूच्या रुग्णांची शंभरी
आज दिवसभरात स्वाइन फ्लूचे १२ नवे रुग्ण सापडल्याने या वर्षातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांनी शंभरीचा आकडा गाठला. दि. १ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०१५ या दिड महिन्याच्या कालावधीत स्वाइन फ्लूचे तब्बल १०० रुग्ण शहरात सापडले आहेत. विशेष म्हणजे गेल्या पूर्ण वर्षभरात स्वाइन फ्लूचे केवळ ३५ रुग्णच सापडले होते.
---