शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

दोरी तुटली अन्... जम्मूतील तवी नदीत एअर फोर्सचं जबरदस्त 'रेस्क्यू ऑपरेशन', दोघांना वाचवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 2:45 PM

जम्मू-काश्मीरमधल्या तवी नदीमध्ये बुडणाऱ्या दोघांचे प्राण वाचवण्यासाठी लष्करानं राबवलेलं रेस्क्यू ऑपरेशन चित्तथरारक होतं.

श्रीनगरः हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पुरात अडकलेल्या लोकांना सेना आणि एनडीआरएफचे जवान शक्य तेवढी मदत करतायत. अनेक ठिकाणी जवानांनी राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशननं अनेकांचे प्राण बचावले आहेत. जम्मू-काश्मीरमधल्या तवी नदीमध्ये बुडणाऱ्या दोघांचे प्राण वाचवण्यासाठी हवाई दलानं राबवलेलं रेस्क्यू ऑपरेशन चित्तथरारक होतं.हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून जम्मूतल्या तवी नदीमध्ये जवानानं उतरून अडकलेल्या दोघांना सुखरूपरीत्या वाचवलं आहे. पहिल्यांदा जेव्हा जवानांनी हेलिकॉप्टरमधून दोरी खाली सोडली, त्यावेळी त्या दोघांनी ती पकडली असतानाच तुटली, त्यामुळे ते दोघेही पुन्हा नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागले. जम्मूतल्या तवी नदीमध्ये जवानांनी राबवलेले हे ऑपरेशन थक्क करणारं होतं. हवाई दलाच्या जवानांनी जबरदस्त साहस दाखवत दोन जणांना सुखरूप वाचवलं.तवी नदीमध्ये चार जण अडकले होते. यातील दोघांना हेलिकॉप्टरमधून दोरी टाकून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ती दोरी तुटल्यानं ते पुन्हा नदीत पडले आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागले. ते दोघेही नदीतल्या एका पीलरवर चढण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर उर्वरित दोघांना वाचवण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं. हवाई दलाचा जवान हेलिकॉप्टरमधून खाली उतरला आणि त्यानं अडकलेल्या दोघांना दोरीला बांधून हेलिकॉप्टरच्या मदतीनं रेस्क्यू केलं. त्यानंतर जवान तिथेच बसून राहिला. जवानाला वाचवण्यासाठी  हेलिकॉप्टर पुन्हा आलं. जवानासाठी दोरी टाकली आणि जवान दोरी पकडून पुन्हा सुखरूप वर आला. या पूर्ण मोहिमेत लष्करानं चित्तथरारक साहसाचं दर्शन घडवलं.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर