शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 21:45 IST

विरोधकांच्या गोंधळानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

नवी दिल्ली: अदानी समूहाशी संबंधित वाद आणि उत्तर प्रदेशातील संभलमधील हिंसाचाराच्या मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसदेत गाजला. अदानी समूहाच्या कारभाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्याबरोबरच, संभाळ हिंसाचारावर चर्चेची मागणी विरोधी खासदारांनी केली. गदारोल वाढल्यानंतर सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी संसदेचे कामकाज संपूर्ण दिवसासाठी तहकूब केले. 

लोकसभेचे कामकाज तहकूबअदानी प्रकरणातील जेपीसी तपासावरुन सरकार आणि विरोधकांमधील दीर्घकाळ चाललेला राजकीय संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही बाजुचे खासदार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासातच अमेरिकेतील न्यायालयाशी संबंधित अदानी समूहाचा वाद स्थगन प्रस्तावाच्या नोटीसांद्वारे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सभापती ओम बिर्ला यांनी ते टाळले. यानंतर विरोधी खासदारांनी त्याला कडाडून विरोध केल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेतही गदारोळ राज्यसभेतही सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापती जगदीप धनखड आणि विरोधी खासदारांमध्ये बाचाबाची झाली. नियम 267 अन्वये अदानी मुद्द्यावर चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधी खासदारांच्या 18 वेगळ्या नोटिस धनखर यांनी फेटाळल्या. त्यापैकी नऊ अदानी प्रकरणावर तर उर्वरित संभाळ विषयावर देण्यात आल्या होत्या. मात्र, असे असतानाही काँग्रेस, तृणमूलसारखे विरोधी पक्ष अदानी समूहाचा मुद्दा उपस्थित करू लागले. यावर अध्यक्षांनी ते रेकॉर्डवर जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

हिंसाचारावरही चर्चेची मागणीत्याचवेळी सपा आणि आम आदमी पार्टीसह काँग्रेसचे काही खासदार संभल हिंसाचारावर चर्चेची मागणी करत होते. सभागृह सुरळीत नाही, त्यामुळे हा मुद्दा मांडता येणार नाही, असे सांगत पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करून विरोधी खासदारांचा सभागृहात बोलण्याचा प्रयत्नही धनखर यांनी हाणून पाडला. यानंतर सभागृहाचे कामकाज आधी सकाळी 11.30 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसGautam Adaniगौतम अदानी