शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नाही, मोदी सरकारचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 2:34 PM

गेल्या काही दिवसांपासून तुकडे तुकडे गँगची चर्चा आहे. देशात घडत असलेला हिंसाचार ही तुकडे तुकडे गँग करत असल्याचा अनेक भाजपा नेत्यांचा दावा आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून तुकडे तुकडे गँगची चर्चा आहे. देशात घडत असलेला हिंसाचार ही तुकडे तुकडे गँग करत असल्याचा अनेक भाजपा नेत्यांचा दावा आहे.तर तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून तुकडे तुकडे गँगची चर्चा आहे. देशात घडत असलेला हिंसाचार ही तुकडे तुकडे गँग करत असल्याचा अनेक भाजपा नेत्यांचा दावा आहे. परंतु एका आरटीआय कार्यकर्त्यानं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तुकडे तुकडे गँगसंदर्भात माहिती मागवली. तर तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता संकेत गोखले यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालयाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. माहिती अधिकारातून मिळालेलं ते उत्तर गोखले यांनी सार्वजनिक केलं आहे.साकेत गोखले पोस्टमध्ये लिहितात, तुकडे तुकडे गँग अधिकृतरीत्या अस्तित्वात नाही. ती फक्त अमित शाह यांची एक कल्पना आहे. तुकडे तुकडे गँग हा शब्दप्रयोग बऱ्याचदा उजव्या विचारसरणीचे लोक डाव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करण्यासाठी करतात. दिल्ली जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालया(JNU)च्या एका कार्यक्रमात कथित स्वरूपात राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या, त्यानंतर तुकडे तुकडे गँग हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जाऊ लागला. त्याचदरम्यान JNU छात्र संघाचे प्रमुख कन्हैय्या कुमार यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या शब्दाचा प्रयोग केला होता. दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रदर्शन करणाऱ्या लोकांचा उल्लेख तुकडे तुकडे गँग असा करत त्यांना शिक्षा देण्याची वेळ आल्याचं अमित शाह म्हणाले होते. या महिन्याच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांवर देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप केला होता. जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विश्वविद्यालयाला वारंवार टार्गेट करण्यात आलं होतं. 

टॅग्स :Amit Shahअमित शहा