Trump to dine in gold; Will drink silver cut tea | ट्रम्प सोन्याच्या ताटात जेवणार; चांदीच्या कपात चहा पिणार

ट्रम्प सोन्याच्या ताटात जेवणार; चांदीच्या कपात चहा पिणार

जयपूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात प्रत्येक बाबीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबीय सोन्या-चांदीचा वर्ख असलेल्या ताटात मिष्टान्नाचा आस्वाद घेणार आहेत. यात ते नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण करणार आहेत. याशिवाय सोन्या-चांदीचा वर्ख असलेल्या टी-सेटमध्ये ट्रम्प यांना चहा दिला जाणार आहे. जयपूरचे प्रसिद्ध डिझायनर अरुण पाबूवाल यांनी ट्रम्प कुटुंबियांच्या वापरासाठी खास कटलरी व टेबल वेअर डिझाईन तयार केले आहे. त्या प्लेटस् दिल्लीला पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय गोल्ड प्लेटेड नॅपकिन सेटही तयार करण्यात आला आहे.

अरुण पाबूवाल यांनी यापूर्वीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी गोल्ड प्लेट तयार केलेल्या आहेत. बराक ओबामा यांच्यासह दोन राष्ट्राध्यक्षांसाठी टेबलवेअर डिझाईन तयार केलेले आहे. याशिवाय मेटल डिझायनर पाबूवाल यांनी क्रिकेट वर्ल्ड कपपासून विश्वस्तरीय सौंदर्य स्पर्धांसाठीही ट्रॉफी व मुकुट तयार केलेले आहेत.

Web Title: Trump to dine in gold; Will drink silver cut tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.