तेलंगणात टीआरएस विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 09:26 IST2016-05-20T09:24:02+5:302016-05-20T09:26:41+5:30

तेलंगणात सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) आपली विजयी घोडदौड चालूच ठेवत पालायर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव केला.

TRS won in Telangana | तेलंगणात टीआरएस विजयी

तेलंगणात टीआरएस विजयी

>हैदराबाद : तेलंगणात सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) आपली विजयी घोडदौड चालूच ठेवत पालायर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव केला. ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. ती तेलंगणा राष्ट्र समितीने हिसकावून घेतली. टीआरएसचे तुम्माला नागेश्वरराव यांनी काँग्रेस उमेदवार सुचारिता रेड्डी यांचा 45,682 इतक्या मताधिक्याने पराभव केला. सध्याच्या मंत्रिमंडळात रस्ते आणि बांधकाममंत्री असलेले राव यांना 9क्,94क् मते पडली, तर सुचारिता रेड्डी यांना 49,258 मते पडली. त्यांना तेलगू देसम व वायएसआर यांच्या पक्षाने पाठिंबा दिला होता. या मतदारसंघात उभे असलेले माकपाचे उमेदवार पी. सुदर्शन राव यांनाही 15,338 मते पडली. काँग्रेसचे वेंकट रेड्डी यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. सुचारिता या त्यांच्या पत्नी आहेत.

Web Title: TRS won in Telangana