शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभावाअभावी शेतकरी अडचणीत

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

निरगुडसर : शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांना मिळणारा बाजारभाव यामुळे बळीराजा यंदाच्या वर्षी पूर्ण अडचणीत सापडला आहे.

निरगुडसर : शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांना मिळणारा बाजारभाव यामुळे बळीराजा यंदाच्या वर्षी पूर्ण अडचणीत सापडला आहे.
वारंवार होणार्‍या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे होणारे नुकसान, ऊसदराबाबत झालेली निराशा, दुग्धव्यवसायास न मिळणार्‍या बाजारभावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ भावाअभावी साधारणपणे साडेतीन ते चार किलो वजनाचे पक्षी शेडमध्ये विक्रीअभावी पडून आहेत़
पोल्ट्री व्यावसायिकांना कोंबड्यांचे संगोपन करणे न परवडणारे झाले आहे़ साधारणपणे एक महिन्यापूर्वी ओपन मार्केटमधून २५ ते ३० रुपये दराने कोंबडीचे पिल्लू चिक्स खरेदी केले जात होते़ एका पिलाच्या संगोपनासाठी खाद्य,औषधेे चिक्स, मजुरी व लाईट, असा एकूण ६० ते ६५ रुपये एक किलोसाठी खर्च होतो. बाजारात याच कोंबडीला ट्रेडर्स व्यापारी अवघ्या ४५ ते ५० रुपये किलोने विकत घेत आहे़ त्यामुळे बॉयलर कोंबडी संगोपनाचा उत्पादनाचा खर्च आणि सद्यस्थितीत मिळणारा बाजारभाव यामध्ये १५ ते २० रुपयांची तफावत आहे़ यामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले असून, गेल्या दोन वर्षांतील हा प्रथमच नीचांकी भाव असल्याचे पोल्ट्री व्यावसायिक ग्रामपंचायत सदस्या ज्योती लाड यांनी सांगितले़ सर्वांत विशेष बाब म्हणजे या ठरणार्‍या दरावर कुठलेही शासकीय नियंत्रण नसून ट्रेडर्सकडूनच हा बाजारभाव निश्चित होतो़
मात्र, कोसळलेल्या बाजारभावाचा विचार करता, किरकोळ चिकन विकणार्‍या दुकानदारांनी ग्राहकांकडून फ ारशी अपेक्षा न ठेवता १२० ते १४० ऐवजी ८०ते ९० रुपये किलोने चिकन विकले पाहिजे, असे ग्राहकांचे मत आहे़
़़़़
छायाचित्राखालील मजकुर-
निरगुडसर (ता़ आंबेगाव) येथील पोल्ट्री शेडवरील बॅ्रायलर पक्षी बाजारभाव कमी असल्यामुळे विक्रीअभावी पडून आहेत़