शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
3
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
6
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
7
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
8
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
9
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
10
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
11
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
12
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
13
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
14
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
15
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
16
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
17
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
18
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
19
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
20
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
Daily Top 2Weekly Top 5

कोंढाळी...

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली कोंढाळी नगरी

विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली कोंढाळी नगरी
१० हजार भाविकांचा सहभाग : श्रीज्ञानेश्वर माऊलीची मिरवणूक
कोंढाळी : स्थानिक श्रीविठ्ठल-रुख्माई मंदिरात अखंड नामसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त गावात श्रीज्ञानेश्वर माऊली पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीत विविध देखावे व विठ्ठल नामाच्या गजराने कोंढाळी नगरी दुमदुमली. या उत्सवात जवळपास १० हजार भाविकांचा सहभाग होता.
पालखी मिरवणुकीच्या स्वागतासाठी गावात ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या. अनेक ठिकाणी स्वागतद्वार उभारण्यात आले होते. शोभायात्रेदरम्यान विविध संघटनांतर्फे मिठाई, चहा, फराळाचे वाटप करण्यात आले. येथील प्राचीन श्रीविठ्ठल-रुख्माई मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड नामसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात भागवत कथा सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले. यात परिसरातील हजारो भाविकांनी सहभाग घेतला.
कीर्तनकार नारायण शेंडे, पांडुरंग बारापात्रे, ज्ञानेश्वर नामदास, भीमराव कोठे, नामदेव टापरे, धनजंय मोरे आदी महाराजांनी हजेरी लावत कीर्तन सादर केले. याप्रसंगी पतंजली योग समिती व भारत स्वाभिमानी ट्रस्टतर्फे मोफत योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले.
श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची भव्य मिरवणूक गुरुवारी दुपारी १ वाजता विठ्ठल-रुख्माई मंदिर येथून निघाली. कोंढाळी, दुधाळा, पांजरा, धूरखेडा वारकरी, खंजेरी भजन मंडळीसह जवळपास १० हजार महिला, पुरुष या मिरवणुकीत सहभागी झाले. मिरवणुकीत हनुमान, तुळजा भवानी, ज्ञानेश्वर आदींचे २५ स्वयंचलित देखावे, जबलपूर येथील मयूर नृत्य, सौंसर मध्य प्रदेश दिंडीसह ही मिरवणूक शनिचरा, ग्रामपंचायत, टाका देवस्थान, बाजार चौक, राऊतपुरा, रामनगर, चांदणी चौक, बसस्टॅण्डमार्गे श्रीसंत गुलाबबाबा आश्रम येथे पोहोचली. मिरवणुकीच्या मार्गात शनिचरा येथे मुस्लीम बांधवातर्फे दूध वितरण करण्यात आले. तसेच संपूर्ण मिरवणुकीदरम्यान घरांसमोर रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले. पालखी मिरवणुकीस विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी सहकार्य केले. (वार्ताहर)