शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचे हस्तांतर करण्यास मुभा

By admin | Updated: October 20, 2015 03:52 IST

जेथे रक्ताचा तुटवडा आहे अशा ठिकाणी ते उपलब्ध होऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका रक्तपेढीतून दुसऱ्या रक्तपेढीत रक्ताचे

नवी दिल्ली : जेथे रक्ताचा तुटवडा आहे अशा ठिकाणी ते उपलब्ध होऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका रक्तपेढीतून दुसऱ्या रक्तपेढीत रक्ताचे हस्तांतर करण्यास मुभा दिली आहे.रक्तघटकांपासून तयार केल्या जाणाऱ्या जीवरक्षक औषधांची उपलब्धता वाढावी यासाठी रक्तपेढ्यांकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त प्लाझ्माची वस्तुविनिमयाच्या स्वरूपात अदलाबदल करण्यासही मंत्रालयाने मुभा दिली असून अशा अदलाबदलीसाठी प्लाझ्माचे मानीव मूल्यही निर्धारित केले आहे.मंत्रालयाने म्हटले की, रक्त आणि रक्त घटकांपासून तयार केल्या जाणाऱ्या जीवरक्षक औषधांची उपलब्धता वाढावी व ती गरज असेल तेथे वेळेवर उपलब्ध व्हावीत यासाठी हे दोन्ही उपाय योजण्यात येत आहेत. ‘नॅशनल ब्लड ट्रान्स्फ्युजन कौन्सिल’च्या शिफारशींनुसार हे निर्णय घेण्यात आले आहेत. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचे आपसात हस्तांतर करण्यास प्रथमच परवानगी देण्यात आली असून त्यासाठी रक्ताचे हस्तांतर सुरक्षितपणे व तत्परतेने कसे केले जावे याची सविस्तर मार्गदर्शिकाही जारी करण्यात आली आहे. मंत्रालयाने असेही स्पष्ट केले की, देशातील काही रक्तपेढ्यांमध्ये प्रसंगी अतिरिक्त रक्त प्लाझ्मा उपलब्ध असतो; परंतु त्याची विल्हेवाट कशी लावावी यासाठी यापूर्वी कोणतेही नियम नसल्याने रक्तपेढ्या अशा अतिरिक्त प्लाझ्माचा व्यापार करीत असत; मात्र आता यासाठीही निश्चित पद्धत ठरवून देण्यात आली आहे. यासाठी प्रति लिटर प्लाझ्मासाठी १,६०० रुपये असे मानीव अदलाबदल मूल्य निश्चित करण्यात आले आहे; मात्र रक्तपेढ्या अतिरिक्त प्लाझ्मा रोखीने विकू शकणार नाहीत. प्लाझ्मा देऊन रक्तपेढ्या त्या बदल्यात गरजेनुसार नित्यवापराची सामग्री, उपकरणे किंवा प्लाझ्मापासून तयार केलेली उत्पादने घेऊ शकतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)