शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

अल काईदाचे भारतीय दहशतवाद्यांना प्रशिक्षण

By admin | Updated: November 7, 2014 04:19 IST

इंडियन मुजाहिदीन व अल काईदा यांच्यातील एक गुप्त संभाषण, तसेच अटक केलेल्या दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही संघटना एकत्र येऊन काम करत

नवी दिल्ली : इंडियन मुजाहिदीन व अल काईदा यांच्यातील एक गुप्त संभाषण, तसेच अटक केलेल्या दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही संघटना एकत्र येऊन काम करत असून, अल काईदा मोठे घातपात घडवून आणण्याचे प्रशिक्षण इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना देत असल्याचे वृत्त आहे. यामुळे भारतीय गुप्तचर अधिकारी चिंतित आहेत. या संघटना भारतात मोठा हल्ला करण्याची तयारी करत आहेत. अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली असून, त्यानुसार भारतातील परदेशी नागरिकांचे अपहरण करणे व भारताचे रूपांतर सिरीया व इराकमध्ये करणे अशा प्रकारचे कट केले जात आहेत. अल काईदा व इराकमधील इसिस संघटना भारतीय दहशतवाद्यांशी संपर्क कसा साधतात, या भेटी अफगाणिस्तानात कशा होतात,याकडे सध्या आमचे लक्ष आहे असे राष्ट्रीय तपास संघटना एनआयएचे प्रमुख शरदकुमार यांनी सांगितले. दहशतवाद्यांचे संघटन तसेच कारवाया वाढताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात वाघा सीमेवर पाकिस्तानात झालेला हल्ला आणि कोलकाता येथे दहशतवादी हल्ला होण्याचा देण्यात आलेला इशारा यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच अल काईदा व इंडियन मुजाहिदीन यांच्यातील संघटनही वाढताना दिसत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)