शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी प्रायोगिक तत्त्वावर सुरू ्नरेनबो नावाने ब्रॅडींग : नागरिकांसाठी ८ दिवसात होणार खुली फोटो आहेत - दीपक लॉग इनला

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST

पुणे : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटीस शनिवार पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरूवात होत आहे. रेनबो या नावाने बीआरटी प्रकल्पाचे ब्रॅडींग करण्यात येणार असून अहमदाबाद बीआरटीच्या धर्तीवर पुणेकरांना ही सेवा पुरविली जाणार आहे. पीएमपीचे अधिकारी व कर्मचार्‍यांकडून शनिवारपासून याची चाचणी घेतली जाणार आहे, त्यामध्ये आलेल्या सर्व अडचणी दूर झाल्यानंतर ८ दिवसांमध्ये नागरिकांसाठी खुली केली जाईल.

पुणे : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटीस शनिवार पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरूवात होत आहे. रेनबो या नावाने बीआरटी प्रकल्पाचे ब्रॅडींग करण्यात येणार असून अहमदाबाद बीआरटीच्या धर्तीवर पुणेकरांना ही सेवा पुरविली जाणार आहे. पीएमपीचे अधिकारी व कर्मचार्‍यांकडून शनिवारपासून याची चाचणी घेतली जाणार आहे, त्यामध्ये आलेल्या सर्व अडचणी दूर झाल्यानंतर ८ दिवसांमध्ये नागरिकांसाठी खुली केली जाईल.
स्वारगेट ते कात्रज मार्गावरील बीआरटी फसल्यानंतर त्यामध्ये झालेल्या सर्व चुका दूर करून महापालिकेकडून संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावरील बीआरटी सुरू केली जात आहे. अनेक चांगल्या सुविधा या बीआरटीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी त्याबाबत माहिती दिली.
कुणाल कुमार म्हणाले, संगमवाडीच्या मार्गावरून केवळ बीआरटीच्या बस धावणार आहेत, त्यामधून एसटी महामंडळ तसेच कोणत्याही खाजगी वाहन नेता येणार नाही. या मार्गावरून दिवसभर ६० बस धावणार आहेत, बसस्टॉपवर बसच्या वेळांची सर्व माहिती प्रवाशांना मिळणार आहे. बसस्टॉपची दिवसातून ३ वेळा स्वच्छता केली जाईल, तसेच २४ तास त्याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत.'
बसस्थानकावर सुध्दा कोणती बस कोठे आहे, किती वेळात बस येईल अशी माहिती प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. स्वारगेट येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे, या नियंत्रण कक्षातून बसचालकाशी संवाद साधता येणार आहे. बसचालकांनाही काही अडचण आल्यास नियंत्रण कक्षाला कळविता येणार आहे. एका जपानी कंपनीकडून नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी खासगी कंपनी नेमण्यात आली आहे.

चौकट
बीआरटी सेवा मिळणार अधिक वेगवान
संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी मार्गावर एसटी महामंडळाच्या बस तसेच इतर सर्व खाजगी वाहनांना मनाई करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुक पोलिसांनी त्याबातचे आदेश काढले आहेत. रेनबो बीआरटीच्या ७० बसच फक्त या मार्गावरून धावू शकतील. यामुळे बीआरटी सेवा अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे. प्रवासाचा कालावधी निम्माने कमी होणार आहे.

चौकट
सुरूवातीचे काही दिवस मोफत
बीआरटी सेवेला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून सुरूवातीचे काही दिवस बीआरटी सेवा मोफत पुरविण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.