शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

अटारी सीमेवर ‘रिट्रीट सेरेमनी’ची वेळ बदलली; सायंकाळी ६ पासून ‘भारत माता की जय’चा घोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 09:00 IST

सध्या जे पर्यटक किंवा स्थानिक लोक ही सेरेमनी पाहण्याची योजना करत आहेत, त्यांना नवीन वेळेनुसारच अटारी सीमेवर पोहोचावे लागेल

अमृतसर - येथील भारत-पाकिस्तान अटारी सीमेवर होणाऱ्या प्रसिद्ध रिट्रीट सेरेमनीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नवीन निर्णयानुसार, आता रिट्रीट सेरेमनी संध्याकाळी ६ वाजता सुरू होऊन ६:३० पर्यंत चालेल. यापूर्वी साडेपाच ते सहा अशी वेळ होती.

सध्याचे उष्ण हवामान आणि दिवसाच्या कमी-अधिक होणाऱ्या प्रकाशाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळाला तसेच सुरक्षा व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी वेळेत बदल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. १ मेपासून हा नवीन निर्णय लागू करण्यात  आला आहे.

‘बिटिंग रिट्रीट’ सोहळा म्हणजे काय?ब्रिटीशांच्या काळात ही सैन्य परंपरा सुरू झाली. ही परंपरा स्वातंत्र्यानंतरही जपण्यात आली. पूर्वी सूर्यास्ताच्या वेळी युद्ध समाप्ती केली जात असे, युद्ध संपविण्याचा एक प्रघात होता. त्यावेळी युद्धावर गेलेल्या सैन्याने परत यावे यासाठी काही सैन्यदल ही विशिष्ट प्रकारचा बॅण्ड किंवा संगीताची धून वाजवत असे.याच प्रकाराला कालांतराने एका सोहळ्याचे स्वरुप येत गेले आणि विविध प्रकारच्या धून, बॅण्ड वाजवण्याच्या कार्यक्रमात त्याचे रुपांतर झाले.  

हजारो लोक कार्यक्रमात होतात सहभागीसध्या जे पर्यटक किंवा स्थानिक लोक ही सेरेमनी पाहण्याची योजना करत आहेत, त्यांना नवीन वेळेनुसारच अटारी सीमेवर पोहोचावे लागेल. बीटिंग रिट्रीट सेरेमनी ही भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांद्वारे साजरी केली जाणारी एक विशेष परंपरा आहे. यात देशभक्तीची झलक पाहायला मिळते. हजारो लोक या कार्यक्रमाचा भाग बनतात. यावेळी भारत माता की जय तसेच वंदे मातरम यांसारख्या घोषणांनी वातावरण देशभक्तीने दुमदुमून जाते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Attari Border Retreat Ceremony Timings Changed; 'Bharat Mata Ki Jai' Resounds

Web Summary : The Attari border retreat ceremony now starts at 6 PM due to weather and better management. The tradition, featuring patriotic displays by soldiers, attracts thousands chanting 'Bharat Mata Ki Jai'.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान