शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

यंदा दसऱ्याला रावणासोबतच दहशतवादाचेही होणार दहन

By admin | Updated: October 11, 2016 04:52 IST

विजयादशमीनिमित्त देशाच्या अनेक भागात रावणाच्या प्रतिमांचे दहन करण्याची परंपरा टिकून असली तरी यंदा लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’मुळे

नवी दिल्ली: विजयादशमीनिमित्त देशाच्या अनेक भागात रावणाच्या प्रतिमांचे दहन करण्याची परंपरा टिकून असली तरी यंदा लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’मुळे या कार्यक्रमांना वेगळा संदर्भ मिळत असल्याचे दिसते. एरवी ‘रावण दहन’ हे वाईट प्रवृत्तींचा प्रतिकात्मक नायनाट या दृष्टीने पाहिले जाते. पण लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केल्यानंतर आता आयोजकांनी रावणाला दहशतवादाचे प्रतिक बनवून त्याचे दहन करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी खास प्रकारचे रावणाचे पुतळे तयार करून घेतले आहेत किंवा नेहमीच्या पुतळ््यांवर या आशयाचे संदेश लिहून घेतले आहेत.दिल्लीत टागोर गार्डनच्या परिसरातील तितरपूरमध्ये रावणाचे पुतळे बनविणाऱ्यांची गेले कित्येक महिने लगबग सुरू आहे. येथे तयार केलेले रावणाचे पुतळे हरियाणा, उत्तर प्रदेश व उत्तराखंडसह दूरवरच्या ठिकाणी पाठविले जातात. या परिसराचा फेरफटका मारून पुतळे तयार करणारे व ते न्यायला आलेल्या लोकांशी बोलल्यावर ‘रावण दहना’चा हा बदललेला ‘मूड’ जाणवतो.यंदाच्या रावण दहनातून दहशतवादाच्या विरोधात संदेश समाजात देण्याचा आमचा विचार आहे, असे पुतळे न्यायला आलेल्या अनेकांनी सांगितले. पुतळे बनविणाऱ्या महेंद्र नावाच्या कलाकाराने सांगितले की, अनेकांनी त्यांच्या रावणाच्या पुतळ््यावर दहशतवादाचा निषेध करणारी घोषवाक्ये लिहिण्यास सांगितले आहे. पुतळ््यांवर काळा कागद लावून, त्यावर चंदेरी अक्षरात आम्ही त्यांना हवे तसे संदेश चिकटविले आहेत.सुभाष नावाचा कलाकार म्हणाला की, दरवर्षी रावणाचे पुतळे बनविण्यामागे काही तरी प्रसंगोपात्त विचार असतो. गेल्या वर्षी खलनायक हा मुख्य विषय होता. यंदा दहशतवादविरोधी लाट आलेली दिसते. काही आयोजकांनी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या नेहमीच्या पुतळ््यांसोबत दहशतवादाचे प्रतिक म्हणून आणखी एक स्वतंत्र पुतळाही तयार करून घेतला आहे. पुतळे बनविणाऱ्या किशोर या कलाकाराने सांगितले की, ज्यांना उघडपणे वाद नकोसा वाटतो, त्यांनी पाकिस्तानचा निदर्शक असा हिरव्या रंगाचा कागद पुतळ््यांवर लावायला सांगितले आहे. कोणताही संदेश न लिहिता त्यांनी पूर्णपणे हिरव्या रंगाचे पुतळे तयार करून घेतले आहेत.आम्ही दहशतवादरूपी संपूर्ण काळ््या रंगाचा एक वेगळा पुतळा तयार करून घेतला आहे. रावण, कुंभकर्ण व मेघनाद यांच्या पुतळ््यांसोबत आम्ही दसऱ्याला त्याचेही दहन करणार असल्याचे नव श्री धार्मिक लीला कमिटीचे प्रेस सेक्रेटरी राहुल शर्मा यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)