रेल्वेतून तरुणीला फेकले

By Admin | Updated: November 21, 2014 03:07 IST2014-11-21T03:07:33+5:302014-11-21T03:07:33+5:30

मध्य प्रदेशच्या करोदा रेल्वेस्थानकावर २९ वर्षांच्या तरुणीला चीजवस्तू लुटून चालत्या रेल्वेतून खाली ढकलून देण्याची घटना घडली

Threw the woman out of the train | रेल्वेतून तरुणीला फेकले

रेल्वेतून तरुणीला फेकले

भोपाळ : मध्य प्रदेशच्या करोदा रेल्वेस्थानकावर २९ वर्षांच्या तरुणीला चीजवस्तू लुटून चालत्या रेल्वेतून खाली ढकलून देण्याची घटना घडली. यात ही तरुणी गंभीररीत्या जखमी झाली आहे.
या तरुणीची आई मिथ्या त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत एका खासगी कंपनीत काम करणारी ही मुलगी उज्जैन येथे दर्शनासाठी येत होती. झाशीच्या पुढे ललितपूर येथे दोन तरुण या रेल्वेत चढले. त्यांनी करोदा स्टेशनजवळ या मुलीचे सामान हिसकावले. तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी व सोन्याचे कानातले खेचून तिला चालत्या गाडीतून खाली ढकलून दिले. या घटनेची माहिती प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना दिली; मात्र कोणीही रेल्वे थांबवली नाही. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Threw the woman out of the train