दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:28 IST2026-01-09T19:27:02+5:302026-01-09T19:28:31+5:30
चौपदरी महामार्गावरून जात असलेला ट्रक न बघता दुचाकीचालक अचानक रस्ता ओलांडायला जातो आणि एक भीषण अपघात घडतो. ज्यात तीन जणांना जीव गमवावा लागला.

दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
Accident Video: एका दुचाकी चालकाच्या चुकीमुळे तीन जणांचा जीव गेला. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात ही घटना घडली. या अपघाताचा थरकार उडवणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत एका व्यक्तीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे.
श्रीकाकुलम जिल्ह्यातील कोर्लाम गावाजवळ असलेल्या बरूआ एक्झिट पॉईंटजवळ हा अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील तीन जण मरण पावले आहेत.
दुचाकी चालकाला वाचावायला गेला अन्...
एक मालवाहू ट्रक महामार्गावरून जात असताना एक दुचाकीचालक मध्येच रस्ता ओलांडायला जातो. अचानक रस्त्याच्या मध्ये आल्याने ट्रकचालक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण, त्यात ट्रकवरील नियंत्रण गमावून बसतो.
त्यानंतर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या कारला ट्रकची धडक बसते. कार धडक बसल्यानंतर दूर फेकली जाते, तर ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन पुन्हा वर येतो. हा अपघात अवघ्या काही क्षणात घडला.
📍Srikakulam District, Andhra Pradesh: On a National Highway, a lorry tried to save a biker, lost control, crossed lanes, and rammed head-on into a car. The impact was fatal , a family of 3 lost their lives, Biker escaped.
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) January 8, 2026
pic.twitter.com/eC6C0GWEBR
एका व्यक्तीने या अपघाताचा व्हिडीओ शेअर नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले आहे. कोर्लाम गावाजवळील बरुआ जक्शनजवळ असलेल्या या ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याचे त्याने म्हटले आहे. लोक रस्ता ओलांडायला जातात आणि अपघात होत असल्याचे त्याने म्हटले आहे.
महामार्गावर या ठिकाणी लोकांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी ना उड्डाण पूल आहे, ना भुयारी मार्ग. त्यामुळे लोकांना जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागत असल्याचे त्याने म्हटले आहे. यासाठी तातडीने उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी मागणी त्याने केली आहे.