पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील ३ अट्टल गजाआड
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:37+5:302015-08-19T22:27:37+5:30

पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील ३ अट्टल गजाआड
>पुणे : पेट्रोल पंपावर रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या ३ अट्टल गुन्हेगारांना खडक पोलिसांनी अटक करुन छर्याचे पिस्टल, कोयता, दांडके, मिरची पूड जप्त केली. त्यांचे २ साथीदार अंधाराचा फायदा घेऊन नातूबागेतील मैदानातून पसार झाले. अनिल दिपक जाधव (वय ३२), बजरंग बलभीम गायकवाड (वय ३९ दोघेही राहणार सर्वोदय कॉलनी, मुंढवा)व बद्रुद्दीन उर्फ बबलू नेसमोहंमद खान (वय सध्या सर्वोदय कॉलनी, मूळ पश्चिम बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत. अविनाश जाधव व सुनिल गायकवाड अशी त्यांच्या पसार झालेल्या साथीदारांची नावे आहेत. मंगळवारी रात्री हवालदार अजय थोरात यांना एका ग्राऊंडमध्ये बाफना आरोपी लपून बसल्याचे समजले. सापळा रचून त्यांना पकडल्यावर पेट्रोलपंपावर दरोडा घालण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोड्याची तयारी, चोरी असे ७ गुन्हे दाखल आहेत. गायकवाड याच्यावरही ७ गुन्हे दाखल असून त्यांना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.