शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

आणखी तीन मुख्यमंत्र्यांनाही मिळाले कोट्यवधी?

By admin | Updated: December 25, 2016 01:06 IST

गुजरातचे मुख्यमंत्री असताना सप्टेंबर २0१३मध्ये नरेंद्र मोदी सहारा उद्योग समूहाकडून घेतलेल्या पैशांचे पुरावे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर त्याच दस्तावेजात काँग्रेस नेत्या

नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री असताना सप्टेंबर २0१३मध्ये नरेंद्र मोदी सहारा उद्योग समूहाकडून घेतलेल्या पैशांचे पुरावे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर त्याच दस्तावेजात काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनाही पैसे मिळाल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त इतरही अनेकांची नावे या यादीत आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री यांच्या नावांच्या नोंदी यादीत आहेत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना २९ सप्टेंबर आणि १ आॅक्टोबर २0१३ रोजी पाच-पाच कोटी मिळून एकूण १0 कोटी दिल्याचे यादीत दिसते. या काळात भाजपा नेते शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना १ आॅक्टोबर रोजीच ४ कोटी दिल्याचे यादीत दिसते. या काळात भाजपा नेते रमनसिंह हे मुख्यमंत्री होते. भाजपाचे पदाधिकारी यांना १५ कोटी दिल्याची नोंद यादीत आढळते. मुंबई भाजपाच्या एका पदाधिकारी महिलेलाही ५ कोटी दिल्याचे यादीत दिसते. यादीनुसार, त्यांना चार टप्प्यांत पैसे दिल्याचा उल्लेख आहे. सप्टेंबर २0१३मध्ये तीन वेळा तर जानेवारी २0१४मध्ये एकदा हे पैसे अदा करण्यात आले.राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानुसार, मोदी यांना सहारा उद्योग समूहाकडून सात वेळा प्रत्येकी ५ कोटी रुपये मिळाले. तसेच दोन वेळा प्रत्येकी २.५ कोटी मिळाले. राहुल यांनी केलेल्या आरोपाला पुष्टी काँग्रेसने पोस्ट केलेल्या दस्तावेजातून मिळते. (लोकमत न्यूज नेटवर्क)