'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 21:38 IST2025-07-14T21:35:09+5:302025-07-14T21:38:53+5:30
आपल्याला सोशल मीडिया आणि पोस्टद्वारे धमकावले जात आहे, असा आरोप करत, पीडितांनाही धमक्या दिल्या जात आहेत. ते सर्व जण भीतीच्या सवटाखाली जगत आहेत. असे गोपाल रय यांनी म्हटले आहे.

'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
छांगूर आणि नीतू यांच्या धर्मांतराच्या कटाला बळी पडलेल्यांना, पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्यास मदत करणारे विश्व हिंदू रक्षा परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष गोपाल राय यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आपल्याला सोशल मीडिया आणि पोस्टद्वारे धमकावले जात आहे, असा आरोप करत, पीडितांनाही धमक्या दिल्या जात आहेत. ते सर्व जण भीतीच्या सवटाखाली जगत आहेत. असे गोपाल रय यांनी म्हटले आहे.
गोपाल राय यांनी सोमवारी माध्यमांसोबत बोलताना सांगतिले की, लव्ह जिहादला बळी पडलेल्या महिलांना धमक्या दिल्या जात आहेत. आपल्यालाही पोस्टाद्वारे पत्रे पाठवून धमक्या देण्यात आल्या आहेत. गोपाल राय यांच्या संघटनेने छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीनचे जिहादी नेटवर्क उघड केले होते. त्यानंतरच प्रशासन सक्रीय झाले. यूपी एटीएसने छांगूर आणि नीतू उर्फ नसरीन यांना अटक केल्यानंतर, छांगूरची टोळी बिथरली असून, त्यांना जीवे मारण्याची धमीक देत आबे.
हटवलेली सुरक्षा पुन्हा देण्याची मागणी -
गोपाल राय यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की, आपल्याला पुन्ह सुरक्षा देण्यात यावी. आपल्या आणि छांगूर पीडित महिलांच्या जीवाला धोका आहे. आपल्यावर या पूर्वीही दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला आहे. तत्पूर्वी, आपल्यावर वाराणसीमध्ये मुख्तार अंसारीच्या गुंडांनी आणि दुसऱ्यांदा जम्मू-काश्मीरातील दहशतवाद्यांनी हल्ला केला, असा आरो त्यांनी केला होता. यानंतर, त्यांना सुरक्षा देण्यात आली होती. जी काही दिवसांपूर्वीच काढून घेण्यात आली आहे.
पोलिसांवर तक्रा न नोंदवल्याचा आरोप -
गोपाल राय यांनी म्हटले आहे की, आपण धमक्या मिळाल्यासंदर्भात गोमतीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. जर आपल्यासोबत काही बरे वाईट घडले, तर त्यासाठी पोलीस जबाबदार असतील. दरम्यान, गोपाल राय यांनी, धार्मिक धर्मांतराला बळी पडलेल्या आणि ३ जुलै रोजी विशाल खांड येथील गोमतीनगर येथील एका मंदिरात पुन्हा हिंदू धर्म स्वीकारलेल्या पाच मुलींची ओळख माध्यमांसमोर करून दिली.