शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

इसिस आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांपासून धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2015 02:43 IST

इस्लामिक स्टेट्स (इसिस) आणि लष्कर-ए-तोयबा (एलईटी) यांसारख्या दहशतवादी संघटनांपासून नव्याने निर्माण झालेल्या धोक्यापासून सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय गृह मंत्रालय

- नबिन सिन्हा,  नवी दिल्लीइस्लामिक स्टेट्स (इसिस) आणि लष्कर-ए-तोयबा (एलईटी) यांसारख्या दहशतवादी संघटनांपासून नव्याने निर्माण झालेल्या धोक्यापासून सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय गृह मंत्रालय आणि इंटेलिजन्स ब्युरो व राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) अन्य गुप्तचर संस्थांनी सर्व राज्यांना दिलेला आहे.इसिसमध्ये सामील होण्याची इच्छा असलेल्या तीन युवकांना शनिवारी नागपूर विमानतळावर अटक करण्यात आल्यानंतर गुप्तचर संस्थांनी महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, झारखंड, केरळ आणि उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांना नव्याने हा सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. इसिस आणि एलईटी या दोन्ही संघटना आपली फळी मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय युवकांना लक्ष्य बनवित आहेत आणि अशी भाडोत्री माणसं मिळविण्यासाठी भारत हे सोपे लक्ष्य आहे, असे मत गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केले.इसिस आणि एलईटी यांना इंडियन मुजाहिदीनसारख्या (आयएम) संघटना मदत करीत आहेत. दिल्ली, अहमदाबाद, मुंबईसारखी प्रमुख शहरे आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अन्य काही शहरांवर तसेच राजकीय नेत्यांवर हल्ले करण्याची या दहशतवादी गटांची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने नुकत्याच घडून आलेल्या भारत-पाक चर्चेमुळे या गटांना मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळेच हे गट आता चर्चेची ही प्रक्रिया बंद पाडण्याच्या प्रयत्नात आहेत, असे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पोलीस महासंचालकांच्या बैठकीतही या मुद्यावर व्यापक चर्चा करण्यात आली होती. गुप्तचर माहितीचे आदानप्रदान करणे आणि दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने सर्व राज्यांमध्ये समर्पित एटीएस माहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. या प्रयत्नांमुळेच अलीकडच्या काळात इसिस वा अन्य दहशतवादी संघटनांकडे आकर्षित झालेल्या १० ते १५ युवकांना स्थानबद्ध करण्यात आले, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.