शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भगवानगडावर पंकजा मुडे यांच्या समर्थनार्थ जाणार हजारो वंजारी बांधव

By admin | Updated: October 8, 2016 23:51 IST

जळगाव : पाथर्डी तालुक्यातील जि.नगर भगवान गडावर दसरा मेळाव्यानिमित्त राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मंुडे यांच्या समर्थनार्थ जिल्‘ातून हजारो वंजारी बांधव जातील. १० रोजी रात्री जामनेर, जळगाव, पाचोरा व इतर भागातून वंजारी समाजबांधव गडाकडे रवाना होतील, असा निर्णय शनिवारी दुपारी लाडवंजारी सभागृहात झालेल्या बैठकीत झाला.

जळगाव : पाथर्डी तालुक्यातील जि.नगर भगवान गडावर दसरा मेळाव्यानिमित्त राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मंुडे यांच्या समर्थनार्थ जिल्‘ातून हजारो वंजारी बांधव जातील. १० रोजी रात्री जामनेर, जळगाव, पाचोरा व इतर भागातून वंजारी समाजबांधव गडाकडे रवाना होतील, असा निर्णय शनिवारी दुपारी लाडवंजारी सभागृहात झालेल्या बैठकीत झाला.
समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेतर्फे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत वंजारी समाजातील पोटजात असलेल्या लाडवंजारी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासंबंधी कृती समितीही गठीत करण्यात आली. राजेंद्र घुगेपाटील हे या समितीचे प्रमुख आहे.
बैठकीला समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र घुगेपाटील, सुकदेव सानप, रमेश लाडवंजारी, सोमनाथ पाटील, प्रशांत नाईक, शरद घुगे, भरत पाटील, किशोर पाटील, नामदेव नाईक, भानुदास नाईक, ज्ञानेश्वर नाईक, दिनेश घुगे, योगेश सानप आदी उपस्थित होते.

नामदेव शास्त्रींच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
भगवान गडावर गोपीनाथ मुंडे हे अनेक वर्षे दसरा मेळावा घेत होते. सामाजिक मंत्र, एकीचा मंत्र ते द्यायचे. ही परंपरा म्हणून मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळावा मागील वर्षी घेतला. परंतु यंदा भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासंबंधी विरोध केला आहे. हा विरोध ते कुठल्यातरी राजकीय दबावामुळे करीत आहे. शास्त्री यांच्या भूमिकेबाबत बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच यंदाही दसरा मेळावा व्हावा यासाठी पंकजा मुंडे यांना समर्थन देण्याचा निर्णयही झाला.