यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:37 IST2025-09-27T17:36:58+5:302025-09-27T17:37:53+5:30
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावरही हल्ला चढवला.

यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी अररियाच्या फारबिसगंज हवाई पट्टी मैदानात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी, बिहारच्या जनतेला यावेळी चार दिवाळ्या साजऱ्या करण्याच्या आहेत, असे शाह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, एनडीएला पुन्हा एकदा दोनृ तृतियांश बहुमताने विजयी केल्यास आम्ही बिहारच्या या पावन भूमीवरून एक-एक घुसखोर शोधून काढू. दरम्यान शाह यांनी 2025 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 160 प्लसचे टार्गेटही सेट केले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावरही हल्ला चढवला.
यावेळी बिहारमध्ये 4 दिवाळ्या -
चार दिवाळ्या कोणत्या याचा उल्लेख करत, शाह म्हणाले, पहिली दिवाळी प्रभु श्रीराम अयोध्येत परतले त्या स्मरणार्थ, दुसरी बिहारच्या 75 लाख महिलांना पंतप्रधान मोदींनी स्वयंरोजगारासाठी दिलेल्या 10 हजार रुपयांच्या मदतीसाठी, तिसरी जीएसटी सुधारणांमुळे 395 हून अधिक वस्तूंच्या किमती कमी झाल्याबद्दल आणि चौथी बिहारमध्ये एनडीए-भाजप सरकार स्थापन झाल्यावर. शाह पुढे म्हणाले, “दोन तृतियांश बहुमताने सरकार स्थापन होताच प्रत्येक घुसखोराला बिहारमधून हुसकावून लावू.” यावेळी केवळ स्वदेशी वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले.
शाह यांनी लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसवर भष्टाचाराचे आरोप केले, तसेच, गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधक करू शकले नाही, असेही शाह म्हणाले. एवढेच नाही तर, घुसखोरांनाही मतदानाचा हक्क मिळावा, अशी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची इच्छा आहे. मात्र, घुसखोरांना मतदानाचा हक्क कधीच मिळणार नाही, हा आमचा संकल्प आहे,” असेही शाह यावेळी म्हणाले.