शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात 'मास्टर प्लॅन...'! थाळी, घंटा अन् ढोल वाजवत मतदानासाठी घराबाहेर पडा; PM मोदींचा कार्यकर्त्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:43 IST

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी आरके पुरम येथील जाहीर सभेला संबोधित करताना विजयाचा पूर्णविश्वास व्यक्त केला. याचवेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मतदानाच्या दिवशी 'थाळी-घंटा आणि ढोल' वाजवण्याचे आवाहन केले, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज सोमवारी सायंकाळी थांबेल. या निवडणुकीच्या पारश्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसने मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी संपूर्ण शक्तीनीशी प्रयत्न केले. दिल्लीतील भाजपचा वनवास संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक सभांमधून मतदारांना आपल्याबाजूने आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रविवारी आरके पुरम येथील जाहीर सभेला संबोधित करताना विजयाचा पूर्णविश्वास व्यक्त केला. याचवेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मतदानाच्या दिवशी 'थाळी-घंटा आणि ढोल' वाजवण्याचे आवाहन केले, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? -पंतप्रधान म्हणाले, "दिल्लीला या 'आपदा'पासून मुक्त करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रावर किमान ५ भाजप समर्थकांना सोबत घेऊन जावे आणि भाजपला मत मिळवून द्यावे. 'लोकशाही हा एक उत्सव आहे. निवडणुकीच्या दिवशी, २०-२५ जणांचा एक गट करून मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा. थाळी वाजवत जा, घंटा वाजवत राहा. ढोल वाजवत जा. उत्सव साजरा करा, लोकशाहीचा उत्सव साजरा करा."

का केलं असेल थाळी, घंटा अन् ढोल वाजवण्याचं आवाहन? -राजकीय तज्ज्ञांच्या मते, पंतप्रधानांच्या या आवाहनामागे एक विशेष कारण आहे. ही निवडणूक म्हणजे, आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यातील चुरशीची लढाई मानली जात आहे. येथील अधिकांश लोक सामना ५०-५० आहे' आहे, असे बोलताना दिसत आहेत. मात्र, 'जय' आणि 'पराजया'चा हा संपूर्ण खेळ स्विंग मतदारांवर अवलंबून असतो. स्विंग मतदार म्हणजे असे मतदार जे सरकारची कामगिरी, यशापयश अथवा वातावरणानुसार कुणाला मतदान करायचे हे ठरवतात. याशिवाय, काही स्विंग मतदार असेही असतात, जे जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षाला मतदान करतात. अशा मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष आपापल्या विजयाची घोषणा करत असतात. 

तज्ज्ञांच्या मते, अशाच मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना थाळी-घंटा आणि ढोल वाजवण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. जर एखाद्या मतदाराने अखेरपर्यंत कुणाला तदान करायचे हा निर्णय घेतला नसेल, तर अशा मतदारा आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा