शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही!

By admin | Updated: September 15, 2014 04:08 IST

रोज १८ तास काम करतो, त्यामुळे कोणी आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. तीन महिन्यांचा काळ अत्यल्प असून मोठ्या अपेक्षा बाळगणे योग्य नव्हे

किशोर कुबल, पणजीरोज १८ तास काम करतो, त्यामुळे कोणी आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. तीन महिन्यांचा काळ अत्यल्प असून मोठ्या अपेक्षा बाळगणे योग्य नव्हे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. याआधीही आपण केंद्रात मंत्री होतो तेव्हा आठ तास काम करायचो, आता काम वाढले आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी कामगिरीचा अहवाल मागितल्याचे वृत्त मात्र त्यांनी फेटाळून लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या १४ केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीबाबत अहवाल मागितला आहे त्यात श्रीपाद नाईक यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. त्या अनुषंगाने त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रात याआधीही तुम्ही मंत्री होता, तेव्हाची कारकीर्द आणि आता, यात काय फरक वाटतो, असे विचारल्यावर ते की, निश्चितच पूर्वी इतके काम नव्हते अर्थात, काम करण्यासाठी कोणी दबाव आणत आहे अशातलाही भाग नाही. मी माझ्या अंत:करणाला स्मरून रोज किमान १८ तास देशाच्या जनतेसाठी देतो, कोणी सांगतो म्हणून नव्हे. तुमच्या कामगिरीवर मोदी असमाधानी असल्याचे वृत्त आहे हे खरे आहे का, असे विचारल्यावर त्यानी माझ्याकडे कोणताही अहवाल मागितला नाही. उलट आपण स्वत:हून तीन महिन्यांतील कामगिरीचा तपशील केंद्र सरकारला १00 दिवस पूर्ण झाले त्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे. केलेल्या कामाची माहिती २५ सप्टेंबरपर्यंत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यास सांगितले आहे. ते मी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वाराणसीचा चेहरामोहरा बदलणारा मोठा प्रकल्प येत आहे, त्यासाठी पर्यटन खात्याचे महत्त्वाचे योगदान आहे. या प्रकल्पाचा रोड मॅप तयार आहे. एक -दोन महिन्यांत कामे मार्गी लागतील. काश्मीर पूरग्रस्तांना खात्याच्या माध्यमातून १00 कोटी रुपये दिले. या काळात ८७ कोटींचे तीन मोठे प्रकल्पही गोव्यासाठी आणले. मुरगाव बंदरात ९ कोटींचे क्रुझ टर्मिनल येत आहे. वर्षभराचे काम तीन महिन्यांत कसे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)