विदेशात काळा पैसा दडवणा-यांभोवती कायद्याचा फास आवळला

By Admin | Updated: February 28, 2015 13:55 IST2015-02-28T13:55:09+5:302015-02-28T13:55:09+5:30

विदेशात बेकायदेशीररीत्या संपत्ती दडवल्यास १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडला आहे.

There is a law frame surrounding the black money stashed abroad | विदेशात काळा पैसा दडवणा-यांभोवती कायद्याचा फास आवळला

विदेशात काळा पैसा दडवणा-यांभोवती कायद्याचा फास आवळला

>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २८ - विदेशात काळा पैसा दडवणा-यांभोवती मोदी सरकारने कायद्याचा फास आवळला आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी कररचनेत सुधारणा करण्याचे सुचवत विदेशात बेकायदेशीररीत्या संपत्ती दडवल्यास १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडला आहे. 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विदेशात दडवलेला काळा पैसा हा नरेंद्र मोदी यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा होता. शनिवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात काळा पैशाभोवती कायद्याचा फास आवळला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील काळा पैशावर आळा घालण्यासाठी बेनामी प्रॉपर्टी ट्रान्सेक्शन बिल सादर करु असेही त्यांनी म्हटले आहे. काळा पैशाविरोधात कठोर पावले उचलत असतानाच जेटसींनी कंपनी करवर पाच टक्क्यांची कपात करुन उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: There is a law frame surrounding the black money stashed abroad