शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

... तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप होईल, योगी सरकारबद्दल भाजपा आमदारच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 1:14 PM

एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजात आमदारांची काहीच भूमिका नाही. आमदारांच्या सूचनांकडे कुणीही लक्ष देत नाही. राठौर हे सितापूरचे आमदार आहेत

ठळक मुद्देराठौर यांनी यापूर्वीही उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. गतवर्षी एप्रिल महिन्यात कथितप्रकरणात त्यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती.

मुंबई - उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार राकेश राठौर आपल्या पक्षाच्या सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कोरोना परिस्थितीवरुन उत्तर प्रदेश सरकारवर त्यांनी टीका केलीय. तसेच, अधिक बोलायला आपण घाबरतो, कारण त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशा शब्दात उत्तर प्रदेशातील आमदाराने राज्य सरकारवरच्या दडपशाहीबद्दल भावना व्यक्त केली आहे. 

एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजात आमदारांची काहीच भूमिका नाही. आमदारांच्या सूचनांकडे कुणीही लक्ष देत नाही. राठौर हे सितापूरचे आमदार आहेत. मी अनेकदा आवाज उठवला आहे, पण आमदारांची लायकी काय, मी जास्त बोललो तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप लावला जाऊ शकतो. सितापूरमधील एका सरकारी रुग्णालयातील ट्रामा सेंटरबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राठौर यांनी योगी सरकारवरच टीका केली. 

राठौर यांनी यापूर्वीही उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. गतवर्षी एप्रिल महिन्यात कथितप्रकरणात त्यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यानंतर, भाजपाने त्यांना नोटीस बजावली होती. टाळी वाजवून कोरोना पळवून लावता येईल का? शंख वाजवून कोरोना पळून जाईल का? आपण मूर्खपणाचे रेकॉर्ड तोडत आहोत. आपल्यासारखे लोकं मूर्ख आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टाळी वाजविण्याच्या आवाहनावर राठौर यांनी प्रतिक्रिया दिली होती. 

आरोग्य व्यवस्था रामभरोसे

अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने योगी सरकारला धारेवर धरले. न्या. अजित कुमार आणि न्या. सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने योगी सरकारला पाच सूचना केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचे सांगत योगी सरकारला फटकारले.

उच्च न्यायालयाने केल्या ५ सूचना 

अलाहाबाद उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने योगी सरकारला कोरोनाच्या परिस्थितीत लढण्यासाठी ५ सूचनावजा सल्ले दिले आहेत. एक म्हणजे बड्या औद्योगिक घराण्यांकडून करण्यात येणाऱ्या दानाची रक्कम वा फंड कोरोनाची लस खरेदीसाठी वापरावा. दुसरे म्हणजे बीएचयू वाराणसीसह गोरखपूर, प्रयागराज, आग्रा, मेरठ येथील ४ मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधा वाढवाव्यात. २२ मेपर्यंत याचा अपग्रेडेशन प्लान न्यायालयाला सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारyogi adityanathयोगी आदित्यनाथGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या