शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

आकाशात इंजिनने पेट घेतला अन् प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला! विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:21 IST

काठमांडूहून इस्तंबूलकडे झेपावलेल्या टर्किश एअरलाईन्सच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे आगीचा थरार पाहायला मिळाला.

काठमांडूहून इस्तंबूलकडे झेपावलेल्या टर्किश एअरलाईन्सच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे आगीचा थरार पाहायला मिळाला. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका इंजिनने पेट घेतल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत वैमानिकाने तत्काळ कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमानाचे कोलकाता विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैमानिकाच्या या तत्परतेमुळे विमानातील शेकडो प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.

नेमकं काय घडलं? 

टर्किश एअरलाईन्सचे 'टीएचव्हाय ७२७' हे विमान काठमांडूहून इस्तंबूलच्या दिशेने जात होते. विमान कोलकाता हवाई हद्दीत असताना अचानक एका इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. विमानात आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, वैमानिकाने गोंधळून न जाता तातडीने आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने घटनेचे गांभीर्य ओळखून धावपट्टी रिकामी केली आणि विमानाला उतरण्याची परवानगी दिली.

प्रवासी सुरक्षित, दुरुस्तीचे काम सुरू 

विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सध्या सर्व प्रवासी विमानतळाच्या वेटिंग एरियामध्ये असून, तांत्रिक पथकाकडून विमानाच्या इंजिनची तपासणी आणि दुरुस्ती केली जात आहे. इंजिनमध्ये आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विमानतळावर घटनांची मालिका 

गेल्या काही दिवसांपासून विमानतळांवर आपत्कालीन लँडिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच वाराणसीमध्ये इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्याने खळबळ उडाली होती. त्या घटनेतही विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते, मात्र तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नव्हते. आता थेट विमानाच्या इंजिनने पेट घेतल्याची घटना समोर आल्याने विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Engine Fire Forces Emergency Landing, Passengers Safe in Kolkata

Web Summary : A Turkish Airlines flight from Kathmandu to Istanbul made an emergency landing in Kolkata after an engine caught fire. All passengers are safe, and the cause of the fire is under investigation. This incident follows a recent bomb scare on another flight, raising safety concerns.
टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळAccidentअपघात