शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित सुनंदाप्रकरणी थरूर यांची दुसऱ्यांदा चौकशी

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांची आज गुरुवारी विशेष तपास पथकाने(एसआयटी) दुसऱ्यांदा चौकशी केली़ थरूर यांना गत चार आठवड्यात दुसऱ्यांदा एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे़ सुनंदा यांच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणाशी निगडीत विविध बिंदूंवर तसेच आयपीएल वादसंबंधित अनेक प्रश्न थरूर यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आल्याचे कळते़

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांची आज गुरुवारी विशेष तपास पथकाने(एसआयटी) दुसऱ्यांदा चौकशी केली़ थरूर यांना गत चार आठवड्यात दुसऱ्यांदा एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे़ सुनंदा यांच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणाशी निगडीत विविध बिंदूंवर तसेच आयपीएल वादसंबंधित अनेक प्रश्न थरूर यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आल्याचे कळते़
दिवसभरात दोन टप्प्यात सुमारे साडेचार तास थरूर यांची चौकशी झाली़ दुपारच्या टप्प्यात थरूर आणि त्यांचा वाहनचालक बजरंगी यांना सामोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली़ थरूर सर्वप्रथम सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात पोहोचले़ येथून सकाळी ११.३० वाजता थरूर यांना दक्षिण दिल्लीच्या वसंत विहार भागातील वाहन चोरीविरोधी पथकाच्या कार्यालयात नेण्यात आले़ येथे एटीएसच्या पाच अधिकाऱ्यांनी थरूर यांची चौकशी केली़ यापूर्वी १९ जानेवारीला त्यांना एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते़
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये थरूर परराष्ट्र राज्यमंत्री असताना थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांना आयपीएलच्या कोची संघाचे ७० कोटी रुपयांचे समभाग फुकटात मिळवून देण्यासाठी पदाचा वापर केला, असा आरोप त्यांच्यावर झाला होता़ थरूर यांनी हा आरोप फेटाळून लावला होता़ याबाबत थरूर यांना प्रश्न विचारण्यात आले़ याशिवाय गतवर्षी १५ जानेवारीला सुनंदा व थरूर यांच्यात विमानतळावर झालेले कथित भांडण आणि त्यानंतर थरूर यांना विमानतळावर एकटे सोडून सुनंदा यांनी लीला हॉटेलमध्ये केलेला प्रवेश या घटनाक्रमाबाबतही प्रश्न विचारण्यात आले़ याच लीला हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ रोजी सुनंदा मृतावस्थेत आढळल्या होत्या़
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आतापर्यंत १५ लोकांची चौकशी केली आहे़ यात थरूर, त्यांचे कर्मचारी आणि जवळच्या मित्रांचा समावेश आहे़ सुनंदा यांचा मुलगा शिव मेनन यालाही गत ५ फेबु्रवारीला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते़ यावेळी शिव मेननला थरूर आणि त्यांची पत्नी सुनंदा यांच्यातील नातेसंबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले होते़